औसा शहरातील उर्दु घर येथे सुरक्षेच्या कारनास्तव CCTV कॅमेरा बसवा ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही

औसा शहरातील उर्दु घर येथे सुरक्षेच्या कारनास्तव CCTV कॅमेरा बसवा ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही 


औसा प्रतिनिधी
सविस्तर वृत , औसा शहरातील नगर परिषद मालकीचे नगर पालीकेच्या सांस्कृतीक सभागृह लगत उर्दु घर बांधण्यात आलेले आहे. सदरील उर्दु घर व तीच्या बाजुस अभ्यास केंद्र य तसेच सांस्कृतीक सभागृह आहे. तसेच त्याच्या बाजुस इदगाह कब्रस्तान दर्गा हे ही आहे. सदरील उर्दु घर, सांस्कृतीक सभागृह व अभ्यास केंद्रच्या भोवती संरक्षण भिंत नाही तसेच सदरील तिन्ही इमारतीच्या देखभालीसाठी सुरक्षा रक्षकही नसल्यामुळे सदरील तिन्ही इमारत सध्या तर बेवारस असल्यासारखे आहे.
हे की, परवा काही असामाजिक व्यक्तीने उर्दू घराच्या भिंतीवर जातीवाचक लिखाण केले होते. सदरील घटनेचे सुजान लोकांनी दखल घेतल्यामुळे शहरात मोठा होणारा अनर्थ टळला म्हणून आपण त्वरीत या उर्दु घराला व आजुबाजुच्या नगर परिषद मालकीच्या जागेत CCTV कॅमेरे बसवून उपकृत करावे ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही असे निवेदन 
जाफर खोजन अध्यक्ष सार्वजनिक टिपु सुलतान समिती,औसा
अरशद कुरेशी भाजपा युवा अल्पसंख्याक शहराध्यक्ष, औसा खाजा शेख युवक कॉंग्रेस यांनी मुख्याधिकारी न प औसा ला दिलेला आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या