समृद्धी हायवेप्रमाणेच शेतकऱ्यांंना मोबदला द्या- खा. ओमराजे निंबाळकर

समृद्धी हायवेप्रमाणेच शेतकऱ्यांंना मोबदला द्या- खा. ओमराजे निंबाळकर



उस्मानाबाद- महाराष्ट्र रिपोर्टर- महाराष्ट्र राज्यातुन जाणाऱ्या सुरत चेन्नई हायवेबाधीत शेतकऱ्यांच्या शेतजमीनींचे भुसंपादन मोबदला राज्यातील समृद्धी महामार्गाप्रमाणेच देण्यात याव्यात अशी ठोस मागणी शासनाकडे करणार असल्याचे खा. ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या बैठकीत सांगितले आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी जिल्ह्यातील परंडा व तुळजापूर तालुक्यातील बाधित होणाऱ्या सुरत चेन्नई हायवेबाधीत शेकडो शेतकरयांनी खा. ओमराजे निंबाळकर यांच्या समवेत बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
           दरम्यान यावेळी बोलतांना ते म्हणाले की, समृद्धी हायवे हा राज्यातील महामार्ग आहे त्याला शासन चालू बाजार भाव मुल्यनुसार थेट खरेदी करत असेल तर सुरत चेन्नई हायवे बाधीत शेतकऱ्यांना समृद्धी हायवेप्रमाणेच मोबदला मिळाला पाहिजे.
शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेतजमिनी या हायवे मुळे बाधित होत असुन ते कायमचेच भुमिहीन होणार आहेत त्यामुळे शासनाने शेतकऱयांना रास्त योग्य बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्यात यावा अशी मागणी शासनाकडे करणार त्याशिवाय एकही जमीन हायवेसाठी देण्यात येणार नाही, असे ते म्हणाले. 
   यावेळी सुरत चेन्नई हायवेबाधीत शेतकरी संघर्ष समिती चे प्रमुख समन्वयक महारूद्र जाधव, कृष्णा इंगळे, बाळासाहेब पवार, साबिर पटेल, समीर पटेल आदी शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या