उदगीर येथे लातूर जिल्हा पोलीस दलाकडून गणेशउत्सव-2023 साठी बनविलेल्या आचारसंहिता पुस्तकाचे अनावरण सन 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना गणेश उत्सव बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

उदगीर येथे लातूर जिल्हा पोलीस दलाकडून गणेशउत्सव-2023 साठी बनविलेल्या आचारसंहिता पुस्तकाचे अनावरण सन 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना गणेश उत्सव बक्षीस वितरण समारंभ उत्साहात..*


लातूर (प्रतिनिधी )
           पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये श्री.गणेश उत्सव-2023 आचारसंहिता पुस्तकाचे अनावरण व व सार्वजनिक गणेश उत्सव बक्षीस वितरण समारंभ- 2022 उत्साहात संपन्न झाला. सदर समारंभास कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य श्री.संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती.

            दिनांक 18/09/2023 रोजी रघुकुल मंगल कार्यालय ,शाहू चौक, उदगीर येथे गणेशउत्सव-2023 अतिशय खेळीमेळीच्या उत्साही वातावरणात पार पाडावे यासाठी लातूर जिल्ह्यातील गणेश मंडळांनी पालन करावयाच्या अटी व नियमांचे समावेश असलेले श्री.गणेश उत्सव-2023 आचारसंहिता पुस्तकाचे अनावरण कॅबिनेट मंत्री श्री.संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सन 2022 मध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये स्थिर देखावा,सजीव देखावा व हलता देखावा तसेच आदर्श गणेशोत्सव मंडळ इत्यादी शीर्षकाखाली सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाची निवड करण्यात आली होती. 
                   उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात मा.कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे प्रमुख उपस्थितीत सर्वोत्कृष्ट 10 गणेश मंडळांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला त्यामध्ये
 
-तरुण गणेश मंडळ

प्रथम क्रमांक- शिवछत्रपती युवक गणेश मंडळ शिवाजी चौक.
द्वितीय क्रमांक-संकटमोचन गणेश मंडळ बिदर नाका उदगीर.
तृतीय क्रमांक आर्य वैश्य गणेश नगरेश्वर मंदिर उदगीर.

-बाल गणेश मंडळ.

प्रथम क्रमांक-बालमित्र गणेश मंडळ, मलगे गल्ली उदगीर.
द्वितीय क्रमांक- बाल गणेश मंडळ, उदगीर
 तृतीय क्रमांक- अष्टविनायक बाल गणेश मंडळ, तारवाड गल्ली, उदगीर.

-व्यापारी गणेश मंडळ.
प्रथम क्रमांक- आडत व्यापारी गणेश मंडळ, मोंढा
 द्वितीय क्रमांक-नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, पत्तेवार चौक, उदगीर.

-उत्तेजनार्थ गणेश मंडळे

 -आजोबा गणेश मंडळ, पारकट्टी गल्ली, उदगीर.
-ओंकार गणेश मंडळ, समता नगर,उदगीर
- स्वामी विवेकानंद गणेश मंडळ, नाईक चौक, उदगीर.
              या मंडळाच्या देखाव्यांना पारितोषिके देण्यात आली. सन्मान चिन्ह मिळवणाऱ्या सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना मा.नामदार संजय बनसोडे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या विविध गणेश मंडळाचे प्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांना गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर आपले मत व्यक्त केले. सार्वजनिक गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप व कार्यकर्त्यांची मानसिकता यावर बहुमूल्य मार्गदर्शन केले.
        लातूर जिल्हा पोलीस दलाकडून गणेश मंडळांनी पालन करावयाच्या नियम व अटीची, विविध उपयुक्त माहिती, संपर्क क्रमांक असलेले "श्री. गणेशउत्सव 2023 आचारसंहिता दक्ष नागरिक" या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. विविध गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
                कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर दिलीप भागवत, पोलीस निरीक्षक (उदगीर शहर) परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक (उदगीर ग्रामीण) अरविंद पवार यांच्यासह उदगीर तालुक्यातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या