निलंगा व औराद बाजार समिती सोयाबीन संशोधनासाठी कडकडीत बंद
कृषी मंत्रीचा जिल्हात कार्यक्रम होऊ देणार नाही.. संतोष सोमवंशी
औराद: सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे स्थापन करावे यासाठी शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली निलंगा व औराद बाजार समितीमधील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.
लातूर जिल्हा गेले दोन दशकापासून सोयाबीन हब म्हणून ओळखला जातो . देशातील एकूण सोयाबीन उत्पन्नाच्या लातूर चा खूप मोठा वाटा आहे. सोयाबीन संशोधन केंद्रामुळे सोयाबीन च्या नवनवीन संकरित जाती विकसित होऊन येथील शेतकऱ्यांना अधिकतम उत्पन्न घेण्यास चालना मिळेल.
लातूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे असताना सोयाबीन परिषद संपन्न झाली होती, त्यात तत्कालीन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे करण्याचे जाहीर केले होते. परंतु 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परळी येथे सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याच्या निषेधार्थ व लातूर येथे केंद्र स्थापन करण्यासाठी पुनर्विचार करावा या मागणीसाठी आज निलंगा व औराद बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवून विरोध नोंदवला . या आंदोलनास महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी, माजी जिल्हाप्रमुख नामदेव मामा चाळक, औराद बाजार समिती सभापती नरसिंग बिराजदार, तालुका प्रमुख अविनाश रेशमे, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, औसा बाजार समितीचे माजी उपसभापती किशोर जाधव, उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब मिरगाळे, किशोर मोहिते, शहरप्रमुख सुनील नाईकवाडे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे अनिल आरिकर, विधानसभा प्रमुख विशाल क्षिरसागर, विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे, मुस्तफा शेख, औराद शहरप्रमुख कन्हेया पाटील, किशोर भोसले, श्रीहरी मुगळे, राम सगरे, विलास लंगर, अनंत जगताप, राजकुमार जाधव, अमोल रेड्डी, रमेश राठोड, किशन मोरे, सौ. दैवता सगर, प्रसाद मठपती, निलंगा आडत अध्यक्ष दत्ता कोराळे, औराद आडत व्यापारी अध्यक्ष शिवाजी शिंदे, सुरेश मुसळे, नेताजी भोईबार,अभिषेक पाटील, राम बिराजदार, सुनिल खंडागळे, आकाश उशारे, विष्णू गवळी, प्रविण भारती व आडत व्यापारी, गुमास्ता, हमाल, गाडीवान व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.