ग्रामिण भागातील शेतकऱ्यांप्रमाणे औसा शहरी भागातील शेतकऱ्यांना विहीरीचे व गोठयाचे व इतरयोजनाचे अनुदान चालु करा-औसा शहरातील समस्त शेतकऱ्यांची मागणी

ग्रामिण भागातील शेतकऱ्यांप्रमाणे औसा शहरी भागातील शेतकऱ्यांना विहीरीचे व गोठयाचे व इतर
योजनाचे अनुदान चालु करा-औसा शहरातील समस्त शेतकऱ्यांची मागणी



औसा प्रतिनिधी मुखतार मणियार 


  औसा - ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना अहिल्यादेवी संचिन विहीर योजना आहे व जनावरांसाठी गोठयाचे योजना आहे, अजून इतर योजना आहेत जे शहरी भागातील शेतकऱ्यांना नाहीत. ज्या काही योजना ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना आहे. ती शहरी भागातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा व अनुदानाचा लाभ भेटने गरजेचे आहे.
तसेच अपुऱ्या पावसाअभावी हताशी आलेले पिक नाहीसे होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्या मानसिकतेतून तो आत्महत्याकडे वळण्याच्या अगोदर शासनाने हेक्टरी एक लाख रूपये अनुदान व शंभर टक्के पिक विमा देवून शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे.अशी मागणी 
औसा शहरातील समस्त शेतकरीच्या वतीने औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी उमर पंजेशा, मुजम्मील शेख, संगमेश्वर उटगे, इलियास चौधरी, अँड शिवाजी सावंत, अँड संतोष औटी, निलेश उटगे, अँड फैय्याज पटेल,बळी पवार,रूकमोद्दीन आळंदकर, इस्माईल शेख, अँड. मुस्तफा इनामदार,नियामत लोहारे यांच्यासह उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या