पुसेसावळी ता. खटाव जि. सातारा येथील अल्पसंख्यांक मुस्लीम समाज बांधवावर हल्ला करणाऱ्या दंगलखोरांवर कडक कार्यवाही करा औशातून मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य कडे मागणी
औसा प्रतिनिधी
सविस्तर वृत असे की, पुसेसावळी ता. खटाव जि. सातारा येथे अक्षेपहार्य पोस्ट केल्याचा मुद्दा पुढे करुन कांही समजकंटकांनी निष्पाप मुस्लीम समाजाच्या घरांना जाळले तसेच त्यांचे दुकाने व हातगाडे व इतर साहित्यांना जाळून धार्मिक स्थळ मस्जीदवर शेकडोच्या संख्येत दंगलखोरांनी हल्ला करुन प्रार्थनेसाठी उपस्थित असलेल्या मुस्लीम बांधवांना मारहाण केल्यामुळे या घटनेत एक निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे. तसेच 20 ते 25 अन्य जखमी असल्याचे समजते. सदरील घटना ही नियोजीत असल्याचे या सर्व प्रकरावरुन दिसून येत आहे. तरी वरील सर्व घटनेची सि.बी. आय. किंवा एस.आय.टी. मार्फत चौकशी करुन यामागचे कर्ते कोण आहेत व मुख्य आरोपी कोण आहेत तपास करुन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी तसेच दंगलखोरांवर बुलडोजर कायदा लावण्यात यावा व तसेच या सर्व प्रकरणात निष्काळजी करणाऱ्या पोलीस प्रशासनातील दोषी वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी
शकील शेख' अँड म. समीमोफीन पटेल,अज़हर हाश्मी,माजीद काझी,अहमद शेख (पप्पु),शेख अफसर,मुजम्मिल शेख,खुन्दमीर मुल्ला ,अनीस जागीरदार, जमीर सय्यद, शेख आदिल,सय्यद कलीम,हमजा शेख,काजी सुजात,युनुस चौधरी शेख आदि
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.