*बांधकामावरील लोखंडी साहित्य चोरणारा जेरबंद.. लोखंडी साहित्य,वाहनासह 1 लाख 66 हजार रुपयाच्या मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*
लातूर (प्रतिनिधी )
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये होणारे चोरी व घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देशित करून सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात विविध तपास पथके तयार करण्यात आली होती. सदरच्या पथकामार्फत जिल्ह्यात घडलेल्या,विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळवण्यात येत होती.
गुन्ह्याची माहिती काढत असताना दिनांक 16/10/ 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, बांधकामावरील लोखंडी साहित्य चोरणारी टोळी कार्यरत असून सदरच्या टोळीने चोरलेला मुद्देमाल आज वाहनांमध्ये भरून इतरत्र विक्री करणार आहेत. अशी माहिती मिळाली. सदर माहितीची शहनिशा व विश्लेषण करून खात्री पटल्याने सदर पथकाने नांदेड रोडला जाणाऱ्या यशवंत शाळेसमोर थांबलेल्या ऑटोला ताब्यात घेऊन पाहणी केली असता सदर ऑटो मध्ये बांधकामाच्या काही सेंट्रींग प्लेट व सळई मिळून आल्या. ऑटो सोबत असलेल्या इसमाला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव
1) मनोज नागनाथ पांचाळ, वय 21 वर्ष, राहणार बोरी सलगरा, तालुका जिल्हा लातूर. सध्या राहणार कोयना पावर हाऊस जवळ,लातूर
असे असल्याचे सांगितले तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या लोखंडी साहित्याबद्दल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, गेले काही दिवसा पूर्वी मी आणि माझ्या सोबत
1)मंगलाबाई किशोर सोनवणे,
2) सविता कैलाश काळे, दोघे राहणार विलास नगर, नांदेड रोड, लातूर.
अश्यानी मिळून कव्वा रोड परिसरातील एका बांधकामावरील लोखंडी सळई व सेंट्रींग प्लेट चोरी करून काही साहित्य अगोदरच विक्री केले असून राहिलेला साहित्य आज विक्री करणार होतो असे सांगितले.
मिळून आलेल्या साहित्याबाबत लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी केली असता पोलीस ठाणे, विवेकानंद चौक
गुन्हा रजिस्टर क्रमांक 662/2023 कलम 379 भादवी प्रमाणे बांधकामाचे लोखंडी साहित्य चोरीला गेले बाबतचा गुन्हा दाखल असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले.
त्यावरून वर नमूद मुद्देमाल व ऑटो तसेच रोख रक्कम असा 01 लाख 66 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून पुढील कार्यवाही करिता मुद्देमाल व आरोपी संबंधित पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदरच्या पथकाने गुन्ह्याची माहिती मिळताच वरिष्ठांचे मार्गदर्शनात नियोजनबद्ध व अतिशय वेगवान हालचाली करून मुद्देमाल आरोपीसह ताब्यात घेतला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकातील सहाय्यक फौजदार संजू भोसले, पोलीस अंमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, योगेश गायकवाड, प्रकाश भोसले, यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.