औसा तालुक्यातील अवैध दारू विक्री करणारी सराईत गुन्हेगारांची आणखीन एक टोळी लातूरसह तीन जिल्ह्यातून हद्दपार. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी काढले हद्दपारीचे आदेश*

 

*औसा तालुक्यातील अवैध दारू विक्री करणारी सराईत गुन्हेगारांची आणखीन एक टोळी लातूरसह तीन जिल्ह्यातून हद्दपार. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी काढले हद्दपारीचे आदेश*





  औसा (प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यातील भाईगिरी व गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जनसामान्यांना त्रास देऊन वेठीस धरणाऱ्या, नागरिकांच्या जीविताला व त्यांच्या मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा बीमोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आज पावतो हद्दपारच्या एकूण चार प्रकरणात 12 सराईत व कुख्यात आरोपी विरुद्ध कार्यवाही करत त्यांना लातूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

                याबाबत थोडक्यात माहिती अशी की, औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अवैध दारू विक्रीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. 

               जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, सराईत गुन्हेगाराकडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये. याकरिता भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अवैध दारू विक्रीचे गुन्हे करणाऱ्या दोन गुन्हेगारांना एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.


                सदर गुन्हेगारांच्या टोळीचे अभिलेख पाहता पोलीस ठाणे भादा येथे 6 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सदर  टोळी विरुद्ध  लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने प्रवृत्त करण्यासाठी फौजदारी पात्र अपराध करणे, दुखापत, हमला करण्याची पूर्वतयारी करून अवैध दारू विक्री करणे, दुखापत करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कारवाया करणे इत्यादी प्रकारचे एकूण 06 गुन्हे पोलीस ठाणे भादा  येथे दाखल असून त्यांचेवर अनेक वेळा प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. परंतु त्यांच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा न होता त्यांच्याकडून एखादा गंभीर दखलपात्र गुन्हा घडून जनतेच्या मालमत्तेस किंवा धोका इजा होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने टोळी प्रमुख


1) संदीप दिलीप गरड ,वय 35 राहणार ,बिरवली तालुका औसा जिल्हा लातूर


2)प्रवीण दिलीप गरड, वय 22 राहणार बिरवली, तालुका औसा जिल्हा लातूर.


                 त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कार्यवाही करून दिनांक 11/10/2023 रोजी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी हद्दपारिचे आदेश पारित करून नमूद तारखेपासून सदरच्या सराईत गुन्हेगारांना लातूर, सोलापूर व धाराशिव या तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. 

                   हद्दपार केलेल्या नमूद गुन्हेगारांना भादा पोलिसांनी हद्दपार क्षेत्राचे बाहेर नेऊन सोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे.


               सदरचा प्रस्ताव तयार करणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी,(औसा) रामदास इंगवले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस अंमलदार प्रदीप स्वामी, पोलीस ठाणे भादा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे, व पोलीस अमलदार देशमुख , फड यांनी परिश्रम घेतले आहे.

              सदर कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार,उपद्रवी लोकांवर जरब बसून सराईत गुन्हेगारांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे इतर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यां गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या