सनरीच अक्वा परिवार सामाजिक उपक्रमातही अग्रेसर स्वच्छतेसाठी "एक तारीख एक तास उपक्रमात महाश्रमदान

 सनरीच अक्वा परिवार सामाजिक उपक्रमातही अग्रेसर 


स्वच्छतेसाठी "एक तारीख एक तास 
उपक्रमात महाश्रमदान








लातूर / प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार "स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा" अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी 1 ऑक्टोबरला स्वच्छतेसाठी "एक तारीख एक तास" हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वरवंटी ता. लातूर येथे हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सनरीच अक्वा  परिवारच्या वतीने महा श्रमदान करण्यात आले.
     या उपक्रमात प्रा.शाळा वरवंटी , औसा रोड सरस्वती कॉलनी परिसर , औद्योगिक वसाहत बारा नंबर पाटी, औद्योगिक वसाहत पाच नंबर येथील काही भाग येथे स्वच्छता मोहिम राबवून हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन  लातूर येथील उद्योजक बालकिशन मुंदडा संचालक मुंदडा फुड्स व सनरिच एक्वा यांच्या शुभहस्ते करून स्वच्छता ही सेवा मधील स्वच्छतेसाठी "एक तारीख एक तास" या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी
सनरीच एक्वाचे संचालक उद्योजक बालकिशन मुंदडा यांनी सिंगल युज प्लास्टीकचा वापर व दुष्परिणाम याविषयी व स्वच्छतेविषयी यावेळी सविस्तर माहिती दिली. मुख्याध्यापक  रामेश्वर गिल्डा यांनी स्वच्छतेची शपथ उपस्थितांना दिली.
यावेळी  वरवंटी (बसवंतपूर)ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेश पाटील, बसवेश्वर लांडगे (अध्यक्ष शा. व्य. समिती),  ग्रामसेवक शंकर भोसले , रवी शिंदे सदस्य ग्रामपंचायत वरवंटी, रामेश्वर गिल्डा मुख्याध्यापक ,सुजाता खोबरे (सीआरपी) हे यावेळी  उपस्थित होते.मुंदडा फुड्स, व  सनरिच एक्वा परिवार चे स्टाफ कर्मचारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्याच बरोबर नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी "एक तास स्वच्छतेसाठी" अंतर्गत शालेय परिसराची व बाहेरील बाजूची स्वच्छता करून आपली सामाजिक बांधिलकीची जपणूक केली. सनरिच एक्वा परिवार नेहमीच आपल्या विविध सामाजिक उपक्रमाने ओळखली जाते. प्रत्येक विधायक सामाजिक कार्यात ही संस्था नेहमीच अग्रेसर असते, सनरिच एक्वा परिवाराच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
या सार्वजनिक स्वच्छता मोहिमेत स्वयंस्फुर्तीने श्रमदान करण्यासाठी पुढाकार ग्रामसेवक  शंकर भोसले, मुख्याध्यापक  रामेश्वर गिल्डा,  सहशिक्षक मधुकर आडसकर, सहशिक्षिका  सुरेखा भोसले,  वैशाली म्हेत्रे,  अरुणा साठे,  जयलक्ष्मी मजगे,  विजया कुलकर्णी, ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी अंकुश वाघमारे शंकर माने, अंगणवाडी कार्यकर्ती सौ. झुंजेताई सौ. राठोड, आशा कार्यकर्ती  पुष्पलता मस्के, शालेय पोषण आहार मदतनीस  शालुबाई राठोड, बालाजी राठोड यांनी घेतला. याप्रसंगी बहुसंख्येने नागरिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
IMG-20231001-WA0008.jpg
IMG-20231001-WA0007.jpg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या