*कराटे स्पर्धेत म.तकी व तल्हा सैफुल्ला बागवान यांचे यश.
औसा (प्रतिनिधी) ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल औसा येथील विध्यार्थी बागवान म.तकी सैफुल्ला व बागवान तल्हा सैफुल्ला यांनी दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक येथे संपन्न झालेल्या तिसरे मराठवाडा ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत क्रांतीसूर्य कराटे अकॅडमी औसा यांनी आयोजीत केलेल्या फाईट व काता इव्हेंटस मध्ये अनुक्रमे सुवर्ण पदक व कास्य पदक प्राप्त केले आहे.दोघांनीही कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करून त्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याबद्दल शाळेत या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्ष शेख आर.एम.गुरुजी,शाळेच्या मुख्याध्यापिका शेख अंजुमनेहा इकबाल,शिक्षिका सय्यद आयेशा, पठाण तहेनियत,पटेल तरन्नूम,शेख मुस्कान,पंजेशा बुशरा,शेख रिजवाना,सिमा मणियार,उमर शेख तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.