बेरोजगार युवक गुन्हेगारी मार्गावर वळू नये यासाठी लातूर पोलीसांनी आयोजित केलेल्या "रोजगार मेळाव्यात" 48 तरुणांची नोकरीसाठी प्राथमिक निवड*



*बेरोजगार युवक गुन्हेगारी मार्गावर वळू नये यासाठी लातूर पोलीसांनी आयोजित केलेल्या "रोजगार मेळाव्यात" 48 तरुणांची नोकरीसाठी प्राथमिक निवड*














 लातूर (प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून लातूर पोलिस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर व जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर यांच्यातर्फे गुरुवारी दि.12 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री करी बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार शिरसी येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 140 मुलांची मुलाखती घेऊन सुमारे 48 जणांना प्राथमिक निवडपत्र देण्यात आले. मुंबई-पुण्यातील तसेच लातूर येथील 08 कंपन्यांनी, तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य/कर्ज उपलब्ध करून देणारे 05 महामंडळानी या मेळाव्यात सहभाग घेतला आणि उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रता आणि आवडीच्या क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी देण्यात आली.


*पोलिस अधीक्षकांचे विशेष प्रयत्न*


             पोलिसांच्या वतीने गुन्हे नियंत्रण, त्यांची उकल, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचे कामच केले जात नाही तर या भागातील काही तरुण हे पारंपारिक रित्या अवैध हातभट्टी गाळणे त्याची विक्री करणे इत्यादी मध्ये गुंतलेले असल्याने त्यांना वैध रोजगार उपलब्ध करून देणे तसेच बेरोजगारी वाढल्याने युवा पिढी ही वाम मार्गाकडे किंवा गुन्हेगारी कृत्याकडे वळत असल्याचे पोलीस दलाच्या निदर्शनास आल्याने युवापिढीला योग्य रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना गुन्हेगारी कृत्यांपासून तसेच वाम मार्गाकडे जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी असे उपक्रम राबवले जात असल्याचे लातूर पोलिसांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. 

               सध्याच्या आधुनिक व यांत्रिक युगात नोकरीच्या संधी फारच कमी झाल्या आहेत ही वस्तुस्थिती ओळखून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी रोजगाराच्या शोधात असलेली  मुलांसाठी जवळपास 08 कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी त्यांच्याकडील जागेच्या उपलब्धतेनुसार रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यास तयारी दर्शवली.

         मुळात कासारशिरशी पोलीस ठाण्याची हद्द व कासारशिरशी गावाचे  भौगोलिक परिस्थिती पाहता जिल्हाचे व राज्याचे सीमावर्तीभाग असल्याने विविध कारणामुळे तरुणांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे तरुणांमध्ये बेकारी वाढून ते नकळत गुन्हेगारी कृत्य किंवा वाम मार्गाकडे वळले जात होते. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी हीच बाब हेरून  ग्रामीण भागातही, त्यांच्या राहत्या ठिकाणीच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावे याकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस विभागातर्फे मुलांना नोकरी मिळवून दिल्यामुळे नागरिकांत पोलिसांबद्दल आनंदाचे वातावरण होते.


*श्री करी बसवेश्वर विद्यालय कासार शिरसी मध्ये मेळावा.*-


             पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर व जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र श्री  करीबसवेश्वर विद्यालय कासार शिरसी येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी, निलंगा  डॉ. नितीन कटेकर  यांच्या हस्ते करण्यात आले. सदर मेळाव्यात पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी, निलंगा  डॉ. नितीन कटेकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विभाग लातूर चे बालाजी मरे यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर रोजगार मेळाव्यात आलेल्या मुलांच्या या ठिकाणी असलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या. सुमारे 140 उमेदवारांनी प्रत्यक्षात उपस्थिती दर्शवली. यातील 48 जणांना कंपन्यांकडून नोकरीसाठी प्राथमिक निवड करण्यात आली तर 04 उमेदवारांना जस्ट डायल या कंपनीने सेकंड राउंड साठी कॉल दिलेला आहे.

              सहायक पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी पोलीस ठाणे कासार शिरशी हद्दीतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल विभाग,लातूरचे श्री.बालाजी मरे, मेळाव्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेले शैक्षणिक संस्थेचे व विविध कंपनीचे उपस्थित प्रतिनिधी यांचे आभार व्यक्त केले

             सदर मेळाव्याचे नियोजन, आखणी तसेच विविध कंपन्याशी समन्वय, संपर्कासाठी  सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या