लातूर तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी
मोहसीन शेख यांची निवड
लातूर तालुक्यातील चांडेश्वर येथील काँग्रेसचे कार्यकर्ते मोहसीन शेख
यांची लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली
आहे. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि माजी मंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार धिरज विलासराव
देशमुख यांच्या यांचे सूचनेवरुन मोहसीन शेख यांची उपाध्यपदी नियुक्ती
करण्यात आली आहे.
लातूर तालुका काँग्रेस उपाध्यक्षपदीचे निवडीचे पत्र त्यांना 21 शुगर
ली.चे व्हा. चेअरमन विजय देशमुख यांचे हस्ते नियुक्ती पत्र
काँग्रेस भवन, लातूर येथे देऊन पक्षकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी त्यांचे अभिनंदन
करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, लातूर तालुका
काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. अच्युत चव्हाण, विलास साखर कारखान्याचे संचालक
भैरवनाथ सवासे, भाडगांव सोसायटीचे चेअरमन व भाडगांवचे सरपंच गोविंदराव
डोपे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष शिवाजी जाधव, साहित्य सहकारी
मुद्रणालयाचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे, चांडेश्वरचे सरपंच चंद्रकांत
नलवाडे, माजी सरपंच सुबुद्दीन शेख, उपसरपंच मुबारक शेख, सोसायटीचे व्हा.
चेअरमन खलील शेख, बापुराव सपाटे, प्रसाद पुरी, अल्लाबक्ष शेख, भारत पुरी,
गणेश नलवाडे, शुकूर शेख, राहूल नलवाडे, फरीदसाहेब शेख, नद्दीम शेख, रशिद
शेख, निसार शेख, सलमान शेख, अझर शेख, अमजद शेख, सिराज शेख, असलम शेख,
रियाज शेख, अभिजीत भालेकर, वसीम शेख, सईद शेख, जावेद शेख, महेश गुंजरगे
यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.
---
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.