माझं लातूर”च्यावतीने जिल्हा रूग्णालयासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माजी आ.कव्हेकरांचा पाठिंबा

 माझं लातूर”च्यावतीने जिल्हा रूग्णालयासाठी सुरू

असलेल्या आंदोलनाला माजी आ.कव्हेकरांचा पाठिंबा






लातूर दि.03-10-2023
लातूर येथे मंजूर असलेल्या जिल्हा रूग्णालयाचा प्रश्‍न त्वरीत सोडविण्यात यावा, सुपरस्पेशालिटी खाजगीरकरण रद्द करण्यात यावे व सोयाबीन संशोधन केंद्र लातूरलाच उभारण्यात यावे या मागणीसह विविध मागण्यांसाठी शहरातील गांधी चौक येथे “माझं लातूर” संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी पाठिंबा देऊन या मागण्यासाठी सर्वेतोपरी पाठपुरावा करू असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.
यावेळी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत जननायक संघटनेचे सूर्यकांतराव शेळके, माधवराव गायकवाड आदी उपस्थित होते. तसेच शिससेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक यांच्यासह  संजय जेवरीकर, दिपरत्न निलंगेकर, प्रा.डॉ.सितम सोनवणे,  अभय मिरजकर, सतीश तांदळे, शशिकांत पाटील, बाळासाहेब जाधव, राजेश तांदळे, संजय स्वामी, त्र्यंबक स्वामी, रत्नाकर निलंगेकर, खाजा पटवेकर यांच्यासह लातूर शहरातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या