जलालशाही चौक मस्जीदच्या बाजुस कब्रस्तानजवळ होत असलेले सार्वजनिक शौचालय बांधकाम रद्द करा -सय्यद मुज्जफर अली इनामदार

 जलालशाही चौक मस्जीदच्या बाजुस कब्रस्तानजवळ होत असलेले सार्वजनिक शौचालय  बांधकाम रद्द करा  -सय्यद मुज्जफर अली इनामदार 





औसा प्रतिनिधी


 सद्या औसा शहरात वेगवेगळ्या १४ ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलालशाही चौकात मस्जीद व कब्रस्तानजवळ एक सार्वजनिक शौचालय बांधण्यात येत आहे व त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.


सदर शौचालय बांधण्यात येत असलेले ठिकाण हे रस्त्यावर असून सदर रस्त्यावर पुढे मराठा समाज, लिंगायत समाज, राजपुत समाज स्मशानभूमि व कटगर गल्ली कब्रस्तान ला जातो. तसेच औसा शहरातात असलेले नाथ संस्थानाची परंपरा असलेली औसा-पंढरपूर पायी दिंडी याच रस्त्यावरुन जाते. तसेच या रस्त्यावर पुढे राम मंदीर आहे तसेच लगतच असलेले कब्रस्तान हे फार जुने आहे. सदर शौचालयाचे बांधकाम झाल्यास या कब्रस्तान व मस्जीद चे पावित्र्य धोक्यात येणार आहे. तसेच सदर रस्ता हा मंजुर डी.पी. रस्ता आहे. व शौचालय बांधकाम झाल्यास अडथळा निर्माण होणार आहे य नियमाविरुध्द जाऊन आपणास असे करता येत नाही.


तरी जलालशाही चौक येथे बांधकाम करण्यात येणारे शौचालय रद्द करुन इतर ठिकाणी अथवा उद्यानच्या आत बांधकाम करण्यात यावे अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या