देशाची सेवा करताना शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ लातूर पोलीस मुख्यालयात ‘पोलीस स्मृती दिन’ निमित्त शहीद पोलिसांना मानवंदना दिली.


*देशाची सेवा करताना शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ लातूर पोलीस मुख्यालयात ‘पोलीस स्मृती दिन’  निमित्त शहीद पोलिसांना मानवंदना दिली.























लातूर रिपोर्टऱ न्यूज़ ब्यूरो 

              देशातील शहीद पोलीस जवानांचा सर्वोत्तम त्याग व कर्तव्य बजावत असताना विरगती प्राप्त झालेल्या पोलीस शहीदाना मानवंदना देण्यात आली. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या शहीद स्मारक  येथे 21 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 08:00 वाजता लातूर पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृतीदिन निमित्त मानवंदना देण्यात आली. 

 1 सप्टेंबर 2022 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत भारताचे विविध राज्यामधील पोलीस ठाणे तसेच विशेष पथकामध्ये कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या 189  वंदनीय वीर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.


           लडाख मधील भारतीय सिमेवरील बर्फाच्छादीत व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी भारताचे 10 पोलीस जवान गस्त घालत असताना 21 ऑक्टोंबर 1959 रोजी अचानक दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांचेवर हल्ला केला. त्या हल्याला शेवटपर्यंत चोख प्रत्युत्तर देत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. या विर जवानांनी आपल्या देशाच्या सीमेची रक्षण करताना दाखविलेल्या या उच्च कोटीच्या शौर्यांची गाथा इतरांना कळावी तसेच राष्ट्रनिष्टेची व कर्तव्य निष्टेची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत रहावी, म्हणून शहीद पोलीस जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिनांक 21 ऑक्टोंबर हा दिवस संपुर्ण भारतभर पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. 

         जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक, श्री सोमय मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव लातूर, श्री वैभव कलबुर्गे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, प्रभारी पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक श्री सोनकवडे, यांनी तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व अमलदारांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन शस्त्र सलामीसह मानवंदना दिली. 

यावेळी राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री दिलीप माने यांचे नेतृत्वाखालील लाटून ने सलामी शस्त्र, शोक शस्त्र करून हवेमध्ये 03 गोळ्यांच्या फैरी झाडून शहिदांना मानवंदना दिली. 

        यावेळी सूत्रसंचालन व शहिदांचे नाव वाचन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दयानंद पाटील व महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा लटपटे-हंगे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हयातील 45 पोलीस अधिकारी व 350 पोलीस अंमलदार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या