नितिन वामनराव गायकवाड एकंबेकर यांना पीएचडी पदवी प्रदान

 नितिन वामनराव गायकवाड एकंबेकर यांना पीएचडी पदवी प्रदान





औरंगाबाद प्रतिनिधी: लक्ष्मण कांबळे


 नितीन गायकवाड हे  एकांबा येथील रहिवासी असून यांनी आपल्या गरिबीवर  मात करायची या उद्देशाने त्यांनी शिक्षण घेण्याची आस  कधी सोडलीच नाही प्राथमिक शिक्षण हे त्यांनी त्याच्या मूळ गावी सातवी पर्यंत शिक्षण घेतले  गावात आठवीपर्यंत शाळा नसल्याने आठवी ते दहावी पर्यंतचे  शिक्षण उजळंब या गावात पूर्ण कॉलेज चे शिक्षण हे महाराष्ट्रातील उमरगा याठिकाणी अकरावी बारावीचे शिक्षण पूर्ण करून डीएड  पूर्ण करून कुठेतरी शिक्षक व्हावे म्हणून बसवकल्याण ला डीएड चे शिक्षण पूर्ण केले.  डीएड करून नौकरी न लागल्याने नितीन गायकवाड हे नाराज न होता. पुन्हा त्यांनी शिक्षणाला खंड पडूनये म्हणून बीएल उमरगा येथील श्रमजीवी कॉलेजात बीए ची डिग्री पूर्ण केले एवढ्यावरच न थांबता नितीन गायकवाड यांनी परिस्थितिथी चा सामना करत एम ए एफिल  सेट अशी शिक्षणाला गवसणी घातली व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद विद्यापीठाकडून काल  दिनांक 20  ऑक्टोबर रोजी झालेल्या मौखिक परीक्षेत नितीन गायकवाड यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली



डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  औरंगाबाद येथील हिंदी विभागाच्या वतीने नितीन गायकवाड यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी हिंदी उपन्यासों में अभिव्यक्त अंबेडकरवाद (चुनिंदा उपन्यासों की विशेष संदर्भ में) या विषयावर डॉ. अलका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पुर्ण केले. काल झालेल्या ऑनलाईन मौखिक परीक्षेत बहिस्थ परीक्षक म्हणुन डॉ भगवान जाधव, हे होते. तर अध्यक्षस्थानी हिंदी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. भारती गोरे या उपस्थित होत्या. त्यांना पीएचडी पदवी भेटल्याचे  आई वडील नातलग व मित्र मंडळी तसेच गावातील  नागरिकांकडून कौतुक होत आहे.तसेच प्रस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोष्याधक्ष लक्ष्मण कांबळे यांनी ही  नितीन गायकवाड याचे  भ्रमणध्वनी वर संपर्क साधून पुढील जीवन यशवंत व्हा असा संदेश दिला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या