लातूर जिल्हा भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्षपदी प्रा.सुधीर पोतदार ...
..
औसा - राम कांबळे प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून लातूर जिल्ह्य़ात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ओबीसी समाजातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्य करीत असलेले आमदार अभिमन्यू पवार यांचे विश्वासू औसा तालुक्यातील हिप्परगा (क) येथील रहिवासी प्रा सुधीर पोतदार यांची लातूर जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
प्रा. सुधीर पोतदार यांच्या निवडी नंतर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने व औसा शहर भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे सुशीलदादा बाजपाई यांच्या हाताने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.. यावेळी औसा भाजपा तालुकाध्यक्ष श्री सुभाषजी जाधव, सुभाष, जिल्हा प्रभारी श्री संतोषजी मुक्ता, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, औसा शहर मंडळाचे अध्यक्ष सुनील उटगे, बाजार समिती उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे, नारायण साळुंखे,मुक्तेश्वर वाघदरे ,अरविंद कुलकर्णी, बंकट पाटील, रोहयोचे अध्यक्ष सदाशिव जोगदंड, भागवत कांबळे, लहु कांबळे, धनराज परसाने, भीमाशंकर मिटकरी, शिव मुरगे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन अनसरवाडे, श्रीधरजी जाधव, बालाजी निकम, गणेश बिराजदार, विकास हातरगे, ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर इंजे, काकासाहेब सुरवसे, प्रवीण क्षिरसागर ,सौ सुनिता सूर्यवंशी, माधव सिंग परिहार, नितीन शिंदेे, नेताजी जाधव, संदिपान जाधव, लक्ष्मण सोमवंशी, अच्युत पाटील, धनराज काजळे आदी उपस्थित होते......
.... फोटो..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.