आम आदमी पार्टीचे मोदी सरकारला जोडे मारो आंदोलन
लातूर: आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात आम आदमी पार्टी तर्फे लातूर शहरातील गांधी चौक येथे निषेध व जोडे मारो आंदोलन करण्यात आले
सत्येंद्र जैन, मनीष शिसोदिया आणि आता खासदार संजय सिंह अशा दिग्गज आम आदमी पार्टीच्या नेत्यांना मोदी सरकारच्या ED ने दारू घोटाळ्याच्या खोट्या आरोपाखाली अटक केली आहे.
या घोटाळ्याच्या चर्चांना वर्ष उलटून गेले तरी अजनुही या संदर्भात 1 नवा पैसा ED ला मिळालेला नाही तसेच या संदर्भात ED ने कोर्टात कुठलेही आरोपपत्र दाखल केलेले नाही.
केवळ कथित घोटाळा केला असा गाजावाजा करून विरोधी पक्षातील लोकांची ED च्या माध्यमातून पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे अशा संविधान विरोधी सरकारला एक दिवसही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष आश्विन नलबले यांनी केले.
या निषेध आंदोलनात जिल्हाध्यक्ष आश्विन नलबले, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख ओमकार गोटेकर, शहर जिल्हाध्यक्ष रामचंद्र सूर्यवंशी,युवा जिल्हाध्यक्ष विक्रांत शंके, जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष चैतन्य पाटील, शहर संघटक विश्वंभर कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष श्याम माने, युवा उपाध्यक्ष आकाश कांबळे ,युवा जिल्हा सचिव विवेक वाघमारे ,आनंदा कामगुंडा, मोहम्मद रफीक ,आकाश आरगडे, शिवलिंग गुजर, प्रेम काळे व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.