औसा शहरात डेंगू चे थैमान दवाखाने झाले हाउसफुल नगरपालिकेच्या दुर्लक्षपणाचा कळस
औसा प्रतिनिधी मुखतार मणियार
औसा शहरांमध्ये सध्या साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले असून डेंगू तापाचे प्रमाणही वाढले असल्याने डेंगू रुग्णाची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली असून शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी रुग्णालय हे हाउसफुल झाले असून साथीच्या रोगाच्या वाढत्या प्रमाणामुळे दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे. सर्दी, खोकला, ताप सर मलेरिया, कावीळ, गॅस्ट्रो अशा प्रकारचे साथीचे रोगही बळवले असून औसा शहरांमध्ये पाऊस उघडताच डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नगरपालिकेच्या दुर्लक्ष पणाचा कळस झाला आहे. औसा शहरात ठीक ठिकाणी साचलेली घाण व तुंबलेल्या नाल्या यामुळे डासाचे प्रमाण वाढले असून नगरपालिका डास निर्मूलनासाठी कोणत्याही प्रकारचे उपायोजना करीत नसल्याने नागरिकात तीव्र नाराजी पसरली आहे अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभाग कोणत्याही उपाययोजना करण्यास तयार नाही शहरातील डासांचे वाढते प्रमाण लक्षात घेता धूर फवारणी व जंतुनाशक फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे सूर्याचा हस्त नक्षत्र सुरू असून ऑक्टोबर महिन्यात उजाडताच ऑक्टोबर हिट ची झळही नागरिकांना बसत आहे वैशाख व महिन्याप्रमाणे प्रखर उन्हाची तीव्रता वाढली असून उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि साथीच्या रोगामुळे अनेक जण आजारी पडत असून दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या भरमसाठ वाढली आहे. नगरपालिकेने औसा शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये गल्लोगल्ली नालीवर जंतुनाशक औषधाची फवारणी करावी तसेच फॉगिंग मशीन द्वारे दूर फवारणी करून डास निर्मूलनासाठी तातडीने पाऊल उचलावे अशी जनतेतून मागणी होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.