भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी चालू अमरण ऊपोषणाचा तिसरा दिवस संपला तरी प्रशासन गप्प.
ऐन दिवाळीत उपाशी युवकांकडे पाहून गावकरी करत आहेत हळहळ व्यक्त.
शेख बी जी.
औसा.दि.12 तालुक्यातील भादा येथे ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी चालू केलेल्या उपोषणाचा तिसरा दिवस संपला तरी प्रशासनाला जाग येत नसल्याचे बोलले जात आहे.
लातूर जिल्ह्यातील हे आमरण उपोषण सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.गावातील विद्यमान सत्तेत असलेल्या नेतेमंडळी कडून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी गावातील चार युवक आमरण उपोषण करत आहेत. ऐन दिवाळीत सुरू असलेल्या या उपोषणाकडे पाहून गावातील प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे. परंतु प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे उपोषणकर्त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
उपोषणकर्त्यांनी प्रधानमंत्री आवास योजने मध्ये परस्पर निधीचा अपहार केला आहे.त्याची चौकशी व्हावी तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या वैयक्तिक स्वच्छतागृह व शोष खड्डे,शासकीय जागेत ग्रामपंचायतीने शासनाची दिशाभूल करून अनुदान मिळवून दिले व काही कागदोपत्री वैयक्तिक स्वच्छता ग्रह दाखवण्यात आले आहेत याची कसून चौकशी करावी अशी मागणी उपोषण कर्ते करत आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये 25 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या शौचालयाची ही चौकशी व्हावी आणि गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये जाणीवपूर्वक मूळ खर्चात वाढ व पंचायत समिती येथुन अंदाजपत्रकात बदल करण्यात आला याचीही चौकशी व्हावी असेही म्हटले आहे. मनरेगा अंतर्गत गावातील शिवरस्ते व शेत रस्ते करण्यात आली त्या कामासंदर्भात अभियंत्याला हाताशी धरून निकृष्ट दर्जाची कामे करून दिले व बिले लाटण्यात आल्याचे म्हटले आहे.याचीही चौकशी व्हावी.त्याचप्रमाणे गावात वृक्ष लागवड झाली जितका आकडा वृक्षरोपणाचा दाखवण्यात आला तितकी वृक्षरोपण झाले नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. गावातील मुख्य चौकात शासकीय जागेत स्वतःच्या जवळच्या व्यक्तीला लाभ देऊन अतिक्रमण केले आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय भादा येथे स्वच्छतागृह नसल्याचेही यावेळी येथील उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.याप्रकरणी जे दोषी आहेत त्यांना चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.