सौ सरोजा सूर्यवंशी आदर्श सरपंच विठ्ठल पुरस्काराने सन्मानित
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील नागरसोगा ग्रामपंचायतच्या कर्तव्यदक्ष सरपंच सरोजा भास्कर सूर्यवंशी शासनाच्या विविध योजनेतून तसेच लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गावात विकासाची कामे करून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना प्रभावीपणे राबवित वैयक्तिक लाभाच्या योजनाही लाभधारकापर्यंत पोहोचविण्याचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वारकरी साहित्य परिषदेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त सौ. सरोजा भास्कर सूर्यवंशी यांना आदर्श सरपंच विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक श्री विठ्ठल काकाजी ह. भ. प. माधव महाराज शिवनीकर, अभिमन्यू पवार संयोजक सौ. सईताई गोरे, ह. भ. प. दत्तात्रेय पवार गुरुजी, सतीश खडके, विष्णू कोळी, व्यंकट पवार, नवनाथ मेहत्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री विठ्ठलाची मूर्ती शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालय औसा येथे आयोजित वारकरी साहित्य परिषदेच्या जिल्हास्तरीय संमेलनामध्ये सरपंच सरोजा सूर्यवंशी यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला. वारकरी साहित्य परिषदेच्या एक दिवसीय संमेलनामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून शेकडो वारकरी व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमा मध्ये आदर्श पत्रकार आदर्श शेतकरी आदर्श सरपंच व आदर्श डॉक्टरांना विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.