अनुकंपा तत्वावर नोकरी न मिळाल्यामुळे आमरण उपोषण
उस्मानाबाद (प्रतिनिधी )सविस्तर वृत असे की मौजे पांगरी ता. बार्श जि. सोलापुर येथील अनुसुचित जातीचे मित्रजित रामलिंग गायकवाड हे आपल्या कार्यालयासमोर दि. 30/10/2023 रोजी पासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची मागणी आहे की, मित्रजीत यांचे वडील रामलिंग दादाराव गायकवाड हे न्यु ईग्लीश स्कुल, अंबेजवळगे ता. जि. धाराशिव (3. बाद) या शाळेत मुख्याध्यापक म्हणुन सन 2002 पासून कार्यरत होते. दि. ७/१२/२००९ रोजी शाळेवरून घरी जाताना त्यांचा अपघाती मृत्यु झाला. त्यानंतर सन 2090 साली रितसर अनुकंपाखाली त्यांचा मुलगा मित्रजीत गायकवाड यांना नोकरीवर घेण्यासाठी अर्ज केला. मा. शिक्षणाधिकारी (तत्कालीन यांनी सोना नोकरीवर घेण्यासाठी आदेश सन 2010 साली दिला मात्र आजपर्यंत मित्रजीत गायकवाड यांना संस्थाचालक जातीय द्वेषापोटरी नोकरीवर घेण्यास टाळाटाळ करीत
आहे. सदरील संस्थेवर कारवाई करून पीडीत मित्रजीत गायकवाड यास नोकरी मिळवून द्यावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना चे जिलाध्यक्ष धनंजय दुबे अशोक कसबे ग्रामीण जिल्हाध्याक्ष यांनी जिलाधिकारी उस्मानाबाद धाराशिव कडे केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.