मतदार नोंदणीसाठी सर्व मतदान केंद्रांवर
शनिवार, रविवारी विशेष शिबिराचे आयोजन
· नोंदी दुरुस्ती, वगळण्यासाठी अर्ज स्वीकारणार
लातूर, दि.2 (प्रतिनिधी ) : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या शिफारसीनुसार 1 जानेवारी 2024 या दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदींच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज स्वीकारण्यासाठी नोव्हेंबरमध्ये शनिवार, 4 नोव्हेंबर आणि रविवार, 5 नोव्हेंबर रोजी तसेच शनिवार, 25 नोव्हेंबर आणि रविवार, 26 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
विशेष मतदार नोंदणी शिबिरांमध्ये मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून नागरिकांचे मतदार नोंदणी, दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा निवडक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी काही विशेष शिबिरांना भेटी देऊन तेथील कामकाजाचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करणार आहेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.