स्वस्त धान्य दुकान येथे आयुष्यमान भारत कार्ड शिबीर (बुधवार व शनिवार )
लातूर/प्रतिनिधी:आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्रशासनाची महत्वकांक्षी योजना आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबाचा आरोग्य विषयक खर्च कमी करणे आणि त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल याची खात्री करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबाना प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.5 लक्ष चा आरोग्य विमा केंद्रशासनामार्फत लागू करण्यात आलेला आहे.या योजने अंतर्गत मानांकित करण्यात आलेल्या शासकीय व खाजगी रुग्णालयातून विविध 1356 आजारासाठी रु.5 लक्ष मर्यादेपर्यंत मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुषमान कार्ड /गोल्डन कार्ड / ई-कार्ड काढून घेणे गरजेचे आहे .सदर कार्ड पूर्णपणे मोफत मिळविता येते .
तरी सदरील कार्ड काढण्यासाठी महसूल विभागाच्या सहकार्याने शहरातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी प्रत्येक बुधवारी व शनिवारी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या ठिकाणी ई-सेवा केंद्राचे प्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाचे आशा स्वंयसेविका ,एएनएम उपस्थित राहून आयुषमान कार्ड ekycकरून देणार आहे.
तरी नागरिकांनी आपल्या भागातील स्वस्त धान्य दुकान येथे आधार कार्ड व आधारकार्डशी लिंक असलेल्या मोबाईल सह सकाळी 10.00 ते 2.00 वेळेस उपस्थित रहावे. व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आपले आयुषमान कार्ड काढून घ्यावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.