पाहिले राज्य स्तरीय उर्दू नाट्य स्पर्धेत मुंबई प्रथम द्वितीय भिवंडी तर तृतीय पारितोषिक सोलापूरला 🔹 पारितोषिक व स्मरणिका " अक्से हयात" चे प्रकाशन थाटात संपन्न

 पाहिले राज्य स्तरीय उर्दू नाट्य स्पर्धेत मुंबई प्रथम द्वितीय भिवंडी तर तृतीय पारितोषिक सोलापूरला


🔹

पारितोषिक व स्मरणिका " अक्से हयात" चे प्रकाशन थाटात संपन्न

🔹







सोलापूर - अखिल भारतीय उर्दू साहित्य परिषद तर्फे आयोजित दोन दिवसीय राज्य स्तरीय उर्दू नाटय स्पर्धा हुतात्मा स्मृती मंदीर येथे संपन्न झाले, यात पहिल्या 

 दिवशी दहा तर दुसर्‍या दिवशी सहा नाटके सादर सादर करण्यात आली होती 

संध्याकाळी ७ वाजता मुजीब खान याच्या अध्यक्षतेखाली व जफर मोहियोदीन , डॉ अस्लम शेख , एम सलीम शेख , मराठी नाटय मंडळाचे विजय साळूंके , सुमीत फुल मामडी , संस्थेचे अध्यध्यक्ष अॅड यु एन बेरीय ,

सचिव अखलाक शेख , शफी कॅप्टन , उपाध्यक्ष वकार शेख

 यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण व " अक्से ह्यात " ही स्मरणिका प्रकाशन समारंभ संपन्न झाला

नासर आळंदकर कुराण पठन केले , अॅड बेरीया यांनी सर्व पाहुण्यांचे शाल व बुके देऊन सत्कार केले व आपल्या  प्रस्ताविकेत साहित्य परिषदेने आता पर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेत सर्व सहभागी नाटय मंडळाचे आभार मानले

या वेळी कार्यक्रमाचे संयोजक सय्यद . इक्बाल , स्मरणिका समितीचे प्रमुख नासर आळदकर, विकार शेख यांचा प्रमुख पाहुणे मुजीब खान यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा रियाज वळसंगकरनी केले तर कनीज फातीमा कांचवाला यांनी आभार मानले


. प्रमुख अतिथी जफर मोहियोदीन सहभागी नाटय मंडळांना  मार्गदर्शन  करत

म्हणाले नाटकातून राष्ट्रीय एकात्मतेला बळ प्राप्त होते उर्दू नाटकातून क्रिसमस, दिवाळी, तर मराठी नाटकात इद साजरी होताना आपण पाहतो हा सांस्कृतिक दर्शन दोन मनानां व दोन समाजाना जोडणारा माध्यम आहे . या वेळी अस्लम शेख, 'विजय साळूंखे व सुमीत फुलमामडीनी मार्गदर्शन केले व उर्दू नाटय मंडळांना सर्वतपरीने सहकार्य करण्याची  गवाही दिली .

दोन दिवसीय नाटय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाटय समितीचे सय्यद इक्बाल , बशीर परवाज , अ . जब्बार शेख , अशफाक सातखेड , अय्यूब नल्लामंदू , शफी केप्टन , महजबीन मुल्लां , रफीक नल्लामंदू , स्मरणिका समितीचे रफीक खान , नासर आळदकर, इरफान कारीगर , रियाज वळसंगकर, याकुब मंगलगीरी , कनीज फातीमा काचवाला  , जावीद उस्ताद , नियोजन समितीचे वकार शेख 

यांनी खूप मेहनत घेतली



 परिक्षक मुजीब खान यांनी स्पर्धेचा जाहिर केलेला निकाल खातील प्रमाणे ः


♦️प्रथम क्रमांक 

अंजुमने इस्लाम बेगम शरीफा स्कूल मुंबई 

शाजीया शेख व सबा अन्सारी लिखित व अदनान सरखोत दिगदर्शित " पॉईन्ट ऑफ रिटर्न '

🔹.

♦️दूसरा क्रमांक

रफीयोदीन फकीह स्कूल भिवंडी

वसीम अन्सारी लिखित व दिग्दर्शित " रौशन आँखे "

🔹

♦️तिसरा क्रमांक -

सोशल उर्दू हायस्कूल सोलापूर .

. आकाश मनोहर फके लिखि .त

व एजाज शेख अनुवादित ,सतार 

वजाहत दिग्दर्शित 

" मन्नु माय डॉल "


♦️ उत्तजनार्थ - परितोषिक -१ / (विभागून)

एपी जे उर्दू स्कूल सोलापूर

अशफाक सातखेड लिखित व

दिगदर्शित " इदगाह "

♦️ उतेजनार्थ क्रमांक- २

अँगलो उर्दू हायस्कूल पूना

दिलंशाद आसीफ शेख लिखित व

शबाना रोख / हाजरा शेख 

दिग्दर्शित " जमीन की फरियाद "


🟢🟣


उत्कृष्ठ लेखन विभागून

१) वसीम अहमद अन्सारी भिवंडी

नाटक - रौशन आंखे

२) सय्यद इक्बाल सोलापूर

नाटक - कब्रें खोद रहे हैं


🔹 उत्कृष्ट दिग्दर्शक

शाजीया शेख मुंबई

नाटक - पाँईट ऑफ द रिटर्न

🔹 प्रकाश योजना

सलीम बंदुकवाला

नाटक - बस इतनासा ख्वाब

🔹 संगीत - सय्यद मुहाफीज सोलापूर

नाटक - " इदगाह "

🔹 उत्कृष्ट सेट डिझाईन

हाजरा कौसर  शेख पुणे

नाटक - जमीन की फरियाद

🔹 उत्कृष्ट बाल ( पुरुष )कलाकार 

अन्सारी उमरैन भिवंडी

नाटक - रौशन ऑखे

🔹 उत्कृष्ट स्त्री बाल कलाकार

झारा फेरोज शेख मुंबई

नाटक - वेब ग्युअर . खुद की खोज


🟣🟢🟡

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या