जि. प उर्दू प्राथमिक शाळा मंद्रूपचे मॅथ्स जीनियस ओलंपियाड 2023 परीक्षामध्ये नेत्रदीपक यश

 जि. प उर्दू प्राथमिक शाळा मंद्रूपचे मॅथ्स जीनियस ओलंपियाड 2023 परीक्षामध्ये नेत्रदीपक यश






मंद्रूप- केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ द्वारे घेण्यात आलेली मॅथ्स जीनियस ओलंपियाड 2023 या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा मंद्रूपच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.
या परीक्षेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या  राबिया नजीर शेख यांनी 100 पैकी 98, तसलीम शिकलगार यांनी 94 जैनब मुल्ला 94 तसेच इयत्ता चौथीमध्ये हूमेरा मुल्ला यांनी 86 गुण, इयत्ता पाचवीत तंजीला शिकलगार 100 पैकी 96 गुण, इयत्ता पाचवीमध्ये प्रथम क्रमांक पाटकविला आहे.
सदर परीक्षेत जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा मंद्रूपचे इयत्ता तिसरी ते सातवी पर्यंतचे एकूण 40 विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविला होता. यामध्ये शाळेचा एकंदरीत निकाल 98 टक्के लागला आहे. विशेष बाब म्हणजे ही परीक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी होती, तरीपण उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या विद्यार्थ्यांना शाळेची मुख्यद्यापिका सौ. जहाँआरा तांबोळी यांचा विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी स्वतः जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करायला लावली होती. तसेच शाळेतील शिक्षक मेहमूद नवाज व अख्तर शेख ,अब्दुल कादर करजगी, सगरी आणि सैयद यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
शाळेच्या या यशाबद्दल शाळा व्यवसथापन समितीचे अध्यक्ष रसूल शिकलगार व सर्व सदस्य, केंद्र प्रमुख शिवाजीराव जाधव, उर्दू शिक्षण विस्तार अधिकारी दफेदार व  दौलत शेख यांनी अभिंदंन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या