*लातूर पोलीस दलात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांना व त्यांच्या टीमला "सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी"  पुरस्कार.*


                सर्वोत्कृष्ट तपास करुन आरोपींना शिक्षेपर्यंत पोचविणाऱ्या राज्यातील कानाकोपऱ्यातील पोलीस अधिकाऱ्यासह अंमलदारांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात लातूर पोलिसांचाही  सहभाग आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांना व त्यांच्या तपास पथकाला सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक मा रजनीश सेठ  यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख 25 हजार रुपये देण्यात आले आहे. बाळासाहेब नरवटे यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात  कार्यरत असताना गांजाची अवैध वाहतूक करीत असले वरून दाखल झालेल्या गुन्ह्याचा कौशल्यपणाला लावून तपास केला होता. या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात नोव्हेंबर 2022 महिन्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले आहे

                  राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने (सी.आय.डी.) पोलीस संशोधन केंद्र येथे ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ बद्दलचे बक्षिस प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला सी.आय.डी.’चे अपर  पोलीस महासंचालक श्री. प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.दिलीप भुजबळ , आदी उपस्थित होते.

               सन 2020 मध्ये उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गांजाची चोरटी मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने त्याची वाहतूक करताना तीन आरोपींना 176 किलो गांजा आणि जीप असा एकूण  23 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमालासह पोलिसांच्या पथकाने सापळा लावून पकडले होते.    याबाबत वाढवणा पोलीस  ठाण्यात कर्नाटक राज्यातील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाढवणा पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा प्राथमिक पंचनामा व तपास केला होता. पोलीस निरीक्षक सोंडारे यांनी पुढील तपास करून नमूद गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध भरपूर  परिस्थितीजन्य व भौतिक पुरावे गोळा करून दोषारोप न्यायालयात मुदतीत दाखल करण्यात आले होते. 

                सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना तपासी अधिकारी ,समन्स वॉरंट बजावणारे व कोर्ट कामकाज करणारे पोलीस अमलदार यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली. तसेच गुन्ह्यातील इतर साक्षीदार व सदर गुन्ह्याचा पंचनामा करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोषारोपपत्रासोबत दाखल करण्यात आलेल्या परिस्थितीजन्य व भौतिक पुराव्या वरून न्यायालयाने नमूद गुन्ह्यातील आरोपींना दहा वर्ष कारावास व प्रत्येकी एक लाख रुपयाचे दंडाची शिक्षा सुनावली होती.

              ‘सी.आय.डी.’ने राज्यातून सर्व  गुन्ह्यांमधून 12 गुन्ह्यांची ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ बक्षिसासाठी निवड केली होती.या राज्यातील 12 गुन्ह्यात लातूर घटकातील वरील गुन्ह्याची निवड करण्यात आली होती.  सदर गुन्ह्याच्या तपासात लातूर जिल्ह्यातून सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्यासह त्यांच्या टीममधील सहा.पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब साळुंखे ,अशोक माळवदे , पोलीस हवालदार भास्कर सूर्यकर ,डी  पी .येमले , नितीन बेंबडे ,बालाजी अक्केमोड या टीमचे प्रतिनिधी म्हणून सहा पोलीस निरक्षक बाळासाहेब नरवटे व पोलीस अमलदार भास्कर सूर्यकर ,डी.पी येमले, बालाजी अक्केमोड  यांचा अपर पोलीस महासंचालक श्री.प्रशांत बुरडे व विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.दिलीप भुजबळ  यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, गौरवचिन्ह आणि 25 हजार रुपये बक्षिस देण्यात आले.

          सदर टीमला पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या