तूर्तास साखळी उपोषण मागे;दिवाळी नंतर पुन्हा सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू होणार..औसा मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे व उपाध्यक्ष गोपाळ धानुरे यांनी व बांधवांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली..

 दिवाळी नंतर पुन्हा सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू होणार..

..

तूर्तास साखळी उपोषण मागे;

औसा; शहरात तालुक्यातील समस्त मराठा बांधवांच्या वतीने नऊ दिवसापासून सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करीत असल्याची माहिती मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली दि ३ रोजी येथील उपोषण स्थळी औसा मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे व उपाध्यक्ष गोपाळ धानुरे यांनी व बांधवांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली..





मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषनास बसले होते मराठा समाजाला आरक्षण द्यावे याकरिता शहरात तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिबा म्हणून नऊ दिवस झाले साखळी उपोषण सुरू होते दरम्यान गुरुवारी रात्री मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी दि 24 डिसेंबर 2023 पर्यंत सरकारला मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्यासाठी वेळ आहे या दरम्यान आरक्षण नाही मिळाले तर मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान आमरण उपोषण मागे घेऊन गावोगाव साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र औसा तालुक्यातील मराठा बांधवांनी  सध्या दिवाळी तोंडावर असल्याने दिवाळी होई पर्यंत साखळी उपोषण स्थगिती करून दिवाळी झाल्या नंतर तातडीने हे साखळी उपोषण सुरू होणार असल्याचे सांगितले ग्रामीण भागात ही अनेक ठिकाणी सुरू असलेली उपोषण मागे घेण्यात आली आहेत असे ही मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे, व गोपाळ धानुरे यांनी सांगितले यावेळी नागेश मूगंळे, अँड श्याम मोरे, भरत सूर्यवंशी, पुरुषोत्तम नलगे, श्याम भोसले, विश्वास औटी, वैजनाथ सूर्यवंशी, धनराज गोमदे, बाबा थोरात,अशोक नाईकवाडे, नितीन शिंदे,गणेश गायकवाड, बाळु नरवडे, गुणाजी पवार, बालाजी सुर्यवंशी,गजानन शिंदे,विपुल पाटील, लक्ष्मण मुगळे, कैलास थोरात,संतोष खंडागळे,नवनाथ जाधव, दुर्गेश ताकभाते,महादेव जोगदंड, आकाश पाटील, बालाजी जाधव,गोविंद  खंडागळे,संभाजी औटी,अक्षय नरवडे,इश्वर ढोक, व सर्व मराठा समाज बांधव होते...

...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या