आरोग्य विभागातील डाटा एन्ट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

 आरोग्य विभागातील डाटा एन्ट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ





औसा / प्रतिनिधी :


महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य हि संघटना कोरोना महामारीच्या काळापासून ते आजपर्यंत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील आरोग्य विभागात  डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे प्रतिनिधीत्व करणारी संघटना आहे. संघटनेच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये परसरलेल्या असून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आरोग्य विभागात काम करणारे जवळपास 4 हजार डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेशी जुळलेले आहेत. या डाटा एन्ट्री कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कालावधी पूर्ण न करताच कामावरून कमी करण्याचा निर्णय यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पुणे या कंपनीने घेतल्यामुळे हजारो डाटा एन्ट्री कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून महाराष्ट्रातील डाटा एन्ट्री ओपरेटर्स यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.


संपूर्ण देशात कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव पसरला असतांना डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी आरोग्य


विभागात कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदावर स्वतःच्या व परिवाराच्या जिवाची पर्वा न करता वैद्यकिय क्षेत्रात वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या खांद्याला खांदा लावून कोविड लसिकरणापासून ते कोविड टेस्टींग पर्यंतच्या सर्व ऑनलाईन एन्ट्री बाबतच्या जवाबदाऱ्या पार पाडल्या. कोविड टेस्टींगच्या ऑनलाईन एन्ट्री करतेवेळी तसेच कोविड लसिकरणाच्या एन्ट्री करतेवेळी कोरोणा संक्रमणाच्या प्रादूर्भावात येऊन जीव गमविण्याची दाट शक्यता होती, तो ही धोका डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी त्यावेळी पत्करला आणि आपले कार्य अविरतपणे पार पाडून कोरोना संकटातून देशाला बाहेर पडण्यास मदत केली. 


तद्वंतर शासनाने मे. यशस्वी अकॅडमी फॉर स्कील पुणे या संस्थेला संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य विभागात शिकाऊ उमेदवार या नावाने डाटा एन्ट्री ऑपरेटर पुरविण्याचे टेंडर दिले. आरोग्य विभागातील डाटा एन्ट्री कर्मचाऱ्यांनी कोरोना संकट काळात स्वत:ची व परिवाराची पर्वा न करता प्रामाणिकपणे आरोग्य विभागात अविरतपणे सेवा दिली असून या कर्मचाऱ्यांना त्यांचा प्रशिक्षण कालावधी पुर्ण होण्याआधीच कामावरून कमी करण्यात येत असल्याने या निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी संघटनेने केली आहे. डाटा एन्ट्री कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी लातूर, मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. लातूर, जिल्हा आरोग्यधिकारी व तालुका आरोग्याधिकारी औसा, यांच्याकडे निवेदन देवून डाटा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कालावधी पुर्ण करण्याची संधी द्यावी व  (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी केली आहे. या निवेदनावर संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अॅड. भारत फुलारे, उपाध्यक्ष नितीन रेवतकर, सचिव अमोल पुंड, कोषाध्यक्ष सुनिल वाकळे, सह सचिव दत्तात्रय मोठे. व औसा तालुक्यातील डाटा एंट्री ऑपरेटर्स, दुधवाड अश्विनी नामदेव, क्षीरसागर प्रल्हाद अंगद, सय्यद वाजीद गणीसाब, शिंदे प्रियंका नरसिंग, इरले मथुरा, सुर्यवंशी सुनिता शेषेराव इत्यादींच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या