आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळी विरोधात मोक्का (MCOCA) अंतर्गत 1250 पानाचे दोषारोपपत्र दाखल करण्याची मा. अप्पर पोलीस महासंचालक कावसू महाराष्ट्र राज्य यांची मंजुरी, पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात धाडसी कार्यवाही...*


आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळी विरोधात मोक्का (MCOCA) अंतर्गत 1250 पानाचे दोषारोपपत्र दाखल करण्याची मा. अप्पर पोलीस महासंचालक कावसू महाराष्ट्र राज्य यांची मंजुरी, पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात धाडसी कार्यवाही...*






  लातूर (प्रतिनिधी )   15 मे 2023 रोजी  आंबेजोगाई रोड,डी मार्ट जवळ असलेल्या अपार्टमेंट वर सशस्त्र दरोडेखोराने दरोडा टाकल्याची माहिती पेट्रोलिंग वरील पोलिसांना समजली होती. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखा आणि लातूर शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अमलदारांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांना काही तासातच मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले होते. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन विवेकानंद चौक, लातूर येथे गुरनं 316/2023 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

             गुन्ह्याचा तपास करीत असताना सदरचे दरोडेखोरांनी लातूर जिल्ह्यात पाच ठिकाणी तसेच महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी टोळी तयार करून सशस्त्र दरोड्याचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते. दरोडा,जबरी चोरी सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली होती. यांच्याकडे गुन्ह्या बाबत सखोल तपास करुन नमूद गुन्ह्यातील आरोपी हे टोळी करून टोळीने गुन्हे करणारे तरबेज, सराईत,धाडसी, कुख्यात व सक्रिय गुन्हेगार असून त्यांनी लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे रेनापुर, पोलीस ठाणे गांधी चौक व विवेकानंद चौक तसेच महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतःच्या आर्थिक लाभासाठी, संघटितपणे, वेगवेगळे साथीदार घेऊन टोळी निर्माण करून हिंसाचाराचा वापर व कट करून स्वतःचे व टोळीतील साथीदाराचे आर्थिक फायदा करिता सशस्त्र दरोड्याचे गुन्हे करणे, जीवे मारणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे,घातक हत्याराने दुखापत करून लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण केल्याचे निष्पन्न झालेने त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नमूद आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीविरुद्ध  मोक्का (MCOCA) सारख्या कठोर कायद्याप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सूचना दिलेल्या होत्या.

             त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) श्री.भागवत फुंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोअं  पांडुरंग सगरे यांनी सदरील दरोडेखोराविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999  (MCOCA) अन्वये कलम वाढ करण्याबाबत परवानगी मिळण्यासाठीचा प्रस्ताव पाठविलेला होता. सदर प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर मोका कायद्याचे कलम वाढ करण्यात आले होते. गुन्ह्याचा पुढील तपास करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(2), 3(2), 3(4)अन्वये 1,250 पानाचे दोषारोप पत्र विशेष मोक्का न्यायालय,लातूर येथे दाखल करण्याची मंजुरी अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कडून घेण्यात आलेली आहे.

                   पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटित गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या विरुद्ध मोक्का अंतर्गतची ही लातूर जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील दुसरी मोठी कारवाई आहे.


                सदर गुन्ह्यातील नमूद आरोपी 

1)महेश आसाराम चव्हाण, राहणार गेवराई.

2) नितीन संजय काळे उर्फ बापू टांग्या काळे, राहणार अहमदनगर.

3) विकास रामभाऊ भोसले, राहणार बीड.

4) रवींद्र संजय काळे, राहणार अहमदनगर.

5) लक्ष्मण पांडुरंग भोसले, वय 30 वर्ष राहणार, उमापूर तालुका गेवराई जिल्हा बीड (फरार)

6) एक विधी संघर्ष बालक असे आहेत.


               गुन्ह्याचा पुढील तपास विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र नांदेड डॉ.शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांनी केला आहे.

                   सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक श्री.डॉ.अजय देवरे,यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले , विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर ,पोलीस अंमलदार वाजिद चिकले, पांडुरंग सगरे  संतोष खांडेकर यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या