लातूर/प्रतिनिधी: लातूरचे रहिवासी तथा सोलापूर येथील पीडीयु डेंटल महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अभय कुलकर्णी यांनी लिहिलेल्या दातांचे आरोग्य विषयक गैरसमज दूर करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले. मुंबई येथे आयोजित वर्ल्ड डेंटल शो मध्ये मुंबईचे माजी शेरीफ डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मराठी,हिंदी,इंग्रजी व कन्नड या चार भाषांमधून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे.या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ.विवेक पाखमोडे,आयडीएच्या मुंबई येथील मुख्य शाखेचे महासचिव डॉ.अशोक ढोबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.बेंगलोर येथील राईट ऑर्डर पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.सर्वस्थानिक भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय डॉ. अभय कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.