अल्लामा इक्बाल च्या शायरीतून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य .
सोशल महाविद्याल उर्दू विभाग व नजीर मुन्शी गौरव समितीच्या संयुंक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय उर्दू दिवस साजरा
सोलापूर - आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येषठ कवीअल्लामा इक्बालनी आपल्या शायरीच्या माध्यमातून शिक्षण आणि समाज सेवेवर भर देत समाज प्रबोधन केले आहे हेच आदर्श घेऊन आह्मी गरजू व होतकरू विद्यार्थ्याना उच्चं शिक्षण घेण्या साठी शिष्यवृत्ती देत आहोत. अत्तापर्यंत आमच्या नूर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत दोन कोटी बत्तीस लाख इतकी शिष्यवृत्ती दिली .गेली आहे. असे प्रतिपादन नूर ट्रस्टचे अध्यक्ष नजीर मुन्शी यांनी सोशल महाविद्यालय उर्दू विभागच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले. ९ नव्हेंबर अल्लामा इकबाच्या जन्म दिवसा निमित्त जगभरात आंतरराष्ट्रीय उर्दू दिवस साजरा केला जातो. याचे अवचित्य साधून उर्दू विभाग सोशल महाविद्याल आणि नूर सोशल वेल्फेर चारीटेबल ट्रस्ट मध्ये पुढील पाच वर्षा २०२८ पर्यंत सामंजस्य करार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोशल महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी हे होते प्रस्तावना उर्दू विभाग प्रमुख डा. मोहम्मद शफी चोबदार यांनी केली. अध्यक्षीय भाषणात डा. तांबोळी यांनी सांगितले की नूर ट्रस्टनी आमच्या महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांना आत्ता पर्यंत दीड लाख इतकी शिष्यवृत्ती दिलेली आहे. या कार्यक्रमात नूर ट्रस्टचे सचिव इक्बाल अन्सारी, सदस्य प्रा. जैनोद्दीन पटेल , डॉ गढवाल ,
डॉ जैनोदीन मुल्ला , प्रा नारायणकर,आदी उपस्थित होते. नजीर मुन्शी गौरव समिती चे मेहमूद नवाज यांनी सूत्र संचालन केले आणि अय्युब नल्लामंदू यांनी आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.