झाडांना खिळे मारल्यास होणार कारवाई,
१५ दिवसात व्यावसायिकांनी लावलेले फलक स्वतःहून काढून घ्यावेत.
लातूर;प्रतिनिधी: आपल्या व्यवसायाच्या जाहिराती झाडांवर लावण्यासाठी व्यवसायिक यांच्याकडून झाडांना खिळे मारणे, पत्र्याच्या पाट्या मारणे, झाडांवर लायटिंग करणे आदी प्रकार शहरात दिसून येत आहेत. झाडांना खिळे अथवा लोखंडी पाट्या मारणे ही बाब गंभीर असून यापुढे झाडांना खिळे मारल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानने मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आपल्या क्लासेस, व्यवसाय आणि इतर आस्थापना यांच्या जाहिराती झाडांवर लावण्याचे प्रकार शहरात वाढले आहे. जाहिराती लावण्यासाठी झाडांना खिळे मारणे, लोखंडी पाट्या ठोकणे, बोर्ड लावणे, लायटिंग करणे आदी गंभीर प्रकार दिसून येत आहेत. झाडांना खिळे मारल्याने झाडांची वाढ खुंटते, या संदर्भात लातूर मनपाच्या वतीने व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की, १५ दिवसांच्या आत झाडांवर लावलेले फलक स्वतःहून काढून घ्यावेत. जे व्यावसायिक १५ दिवसात झाडांवर लावलेले फलक काढणार नाहीत, त्या जाहिरात करणा-यावर दंडात्मक आणि कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशारा मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.