ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी भादा येथे आमरण उपोषण.
शेख बी जी.
औसा.दि.10 औसा तालुक्यातील मौजे भादा येथे आज दिनांक 10 नोव्हेंबर पासून ग्रामपंचायत ने केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात युवकांनी आमरण उपोषण करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. त्या अनुषंगाने आजपासून भादा येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की घरकुल वाटपापासून व ते योग्य लाभार्थ्याला न मिळाल्यामुळे अर्थपूर्ण व्यवहार करून मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आल्याचे म्हटले आहे.तसेच अतिक्रमण, पाणीपुरवठ्याच्या विहिरीमध्ये करण्यात आलेला घोटाळा, शालेय मैदानावर बांधण्यात आलेल्या शौचालयाचा घोटाळा, ग्रामपंचायत ने केलेल्या सर्व विकास कामाची चौकशी करून जो दोषी आहे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी या प्रमुख मागणीसाठी येथील नागरिक व युवक आमरण उपोषण करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर योगेश शिवलकर,उमाकांत पाटील, अक्षय उबाळे, योगेश पाटील, जन्मेंजय गायकवाड, विश्वनाथ पाटील,दयानंद हजारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. गावातील अधिकाधिक नागरिकांनी या उपोषणात सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रसारमाध्यमांवरून युवकांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.