दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना शस्त्रासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.
लातूर (रिपोर्टऱ न्यूज़ ब्यूरो )याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलीस रात्रगस्त व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करण्याची मोहीम संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवून चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपींना, फरार आरोपींना ताब्यात घेतले जात आहे.
दरम्यान दिनांक 09/12/ 2023 रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, लातूर ते उदगीर जाणारे रोडवरील रेस्टहाऊस जवळील मोकळ्या जागेत एका चार चाकी वाहनामध्ये काही सराईत गुन्हेगार दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमून लपून बसले आहेत. अशी माहिती मिळाली.
त्यावरून सदर माहितीची खातरजमा करून सदरची माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्याने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले यांनी तात्काळ सदरची माहिती वरिष्ठांना कळवून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांना चोहोबाजीने वेळा घालून अतिशय सीताफिने ताब्यात घेण्यात आले.
दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले इसम नामे
1) आकाश भगवान काळे, वय 28 वर्ष, राहणार काळे गल्ली, लातूर.
2) ज्ञानोबा पिराजी सन्मुखराव, वय 38 वर्ष, राहणार बाभळगाव रोड, लातूर.
3) राहुल चंद्रकांत वाघमारे, वय 31 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी, लातूर.
4) हरी बाळू जाधव, वय 37 वर्ष, राहणार वसवाडी, साने गुरुजी शाळेजवळ, लातूर.
5) रणजीत दयानंद कांबळे, वय 28 वर्ष, राहणार महाराणा प्रताप नगर बाभळगाव रोड, लातूर.
6) अनिल बब्रुवान कांबळे, वय 40 वर्ष, राहणार साठे नगर, लातूर.
7) शुभम हनुमंत कराड, वय 22 वर्ष, राहणार रुई रामेश्वर, लातूर (कारचालक)
असे आढळून आले. त्यांची व त्यांच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता त्यांच्याकडे रोख रक्कम, लोखंडी चाकू, धारदार सुरा, वेळूची काठ्या, लोखंडी कटावणी, मिरची पूड व पाच मोबाईल असे साहित्य मिळून आले. त्यांना अधिक विचारपूस केली असता सशस्त्र दरोडा घालण्यासाठी ते अंधाराचा फायदा घेऊन लपून बसले होते असे सांगितले. त्यावरून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 677/2023 कलम 399, 402, 120 (ब) भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे हे करीत आहेत .
सदर गुन्ह्यातील आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणेला शरीराविषयक व मालाविषयक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथका मधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले,काळगे, पोलीस अमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, साहेबराव हाके, योगेश गायकवाड यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.