सरकारला विरोध केला कि देशद्रोही ठरवले जात आहे - मौलाना खलीलुर्रहमान रहेमान नोमानी

 सरकारला विरोध केला कि देशद्रोही ठरवले जात आहे - मौलाना खलीलुर्रहमान रहेमान नोमानी





लातुर -  शहरातील  दिनांक २, ३, डिसेंबर २०२३ दोन दिवसीय समाजप्रबोधन च्या  माध्यमातून प्रवचन , व्याख्यान सह  विविध समाजोपयोगी सामाजिक बांधीलकीची जोपासना करत आपले विचार मांडले यासह भारत देश हा  संविधान वर चालतो यावर ही   प्रबोधन केले  पण सत्ताधारी सरकार विरुद्ध  बोलले तर देशद्रोही ठरवले जात आहे असे परखड मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले भारत देश हा संविधान  व लोकशाही वर चालणारा देश आहे   पण सत्ताधारी हे मालकी समजत आहेत हे प्रसिद्धी माध्यमातून देशासमोर  प्रसिद्ध झाले पाहिजे  भारत  एकसंघ राहून जगावर राज्य करु शकतो पण आज " जाती " च्या  नावावर मुस्लिम समुहावर एनआरसी च्या नावाखाली दहशत निर्माण करण्याचे काम सत्ताधारी भाजपा कडुन होत आहे आजचा युवक हा बेरोजगार होत आहे त्याच्या हाताला काम देण्यासाठी सरकार कायदा करतांना दिसत नाही महागाईने सामान्य जनता त्रस्त  आहे   बेरोजगारी,  कष्टकरी, शेतकरी, यांच्या समस्या महत्वपूर्ण आहे पण भाजपाला धार्मिक वाद मध्ये जनतेचे लक्ष वेधण्यासाठी व राजकीय लाभ व्हावा या उद्देशाने  सरकार कार्य करत आहे तेव्हा सामाजिक , समता ,एकता, बंधुत्व, हे शस्त्र युवकांनी हाती घेण्याची गरज आहे युवकांत  जनजागृती होणे गरजेचे आहे  नियोजनबद्ध कार्यक्रम उपक्रम राबवुन युवक पुढे आला पाहिजे तरंच आम्ही संयमाने जगाचे नेतृत्व करु या साठी

संघटित व्हा संघर्ष करा कारण आम्ही स्वातंत्र्य लढ्यातील महान मुस्लिम क्रांतिकारी यांचे योगदान व बलीदान हे विसरु शकत नाहीत हा इतिहास आहे पण मुस्लीम क्रांतिकारी यांचा इतिहास जगासमोर आणायला सत्ताधारी प्रयत्नशील नाहीत हि खंत आहे कारण मुस्लिम समुहावर विश्वास ठेवला तर तो आपल्या देशासाठी प्राण हि देऊ शकतो पण असं होत नाही जर शेजारी राष्ट्र कडून बंदुकीची गोळी आली तर आपल्या छातीवर घेण्याचे धाड़स हा मुस्लिमच करु शकतो पण आज मुस्लिम समुहावर नको ते आरोप करुन  आरोपीच्या पिंज-यात उभे केले जात आहे हे थाबंल पाहिजे भारत मातेच्या भुमीत हा जन्माला आलेला भारतीय मुस्लिम देश विरोधात नाही तो भारत प्रेमी आहे हे समजण्याची आज खरी गरज आहे  मुस्लीम क्रांतिकारी

यांनी. स्वातंत्र्य साठी  खांदा लावुन  लढा दिला हा इतिहास आहे आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला अभिमान आहे जेव्हा देशावर समस्या येते तेव्हा मुस्लिम समुदाय हा हि जवाबदारी आपल्या खांद्यावर घेतो तेव्हा मुस्लिम समुदायावर  भाजपा कडुन  अन्याय होत आहे हे नाकारता येत नाही मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी शासनाने उपक्रम घेऊन जनजागृती करण्यासाठी नियोजन करने गरजेचे आहे असे म्हणाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या