वाजिदखान पठाण यांची भाजपा अल्पसंख्यांक शिक्षक मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी निवड

 वाजिदखान पठाण यांची भाजपा अल्पसंख्यांक शिक्षक मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी निवड.



शेख बी जी.






औसा.दि.4 लातूर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये अल्पसंख्यांक शिक्षक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अमृशाबाबा उर्दू माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे सचिव वाजिद खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीच्या ध्येय व धोरणांचा प्रभावीपणे प्रचार व प्रसार करून पक्ष बळकट व मजबूत करण्यासाठी काम करावे असे नियुक्तीच्या पत्रात नमूद केले आहे.

वाजिद खान यांच्या चांगल्या कामगिरीमुळे दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.

नियुक्तीच्या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी लातुर शहर जिलाध्यक्ष देवीदासजी काळे सरचिटणीस प्रवीण जी सावंत, सरचिटणीस दिग्विजय जी  काथवटे, शिरिश जी कुलकर्णी, अल्पसंख्याक अध्यक्ष मोहसीन भाई शेख, जमिर भाई शेख, अरिफभाई  सिद्दिकी, जमीर शेख, मोहम्मद शेख आदी उपस्थित होते.

अल्पसंख्यांक शिक्षक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने वाजिद खान पठाण यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केले जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या