घाणीच्या साम्राज्यात औस्याचा "शिक्षण विभाग."
शेख बी जी.
औसा.दि.7 औसा येथील पंचायत समितीचा शिक्षण विभाग सतत घाणीत असल्याचे चित्र दिसून येते.
कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी दुर्गंधीयुक्त वातावरण असल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
औसा येथील गटशिक्षण विभाग व पंचायत समिती एकत्र होती त्यावेळेला या जागेवरती स्वच्छता दिसून येत होती.मात्र पंचायत समिती ची जागा पूर्वीच्या ठिकाणी आल्यानंतर शिक्षण विभाग ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पूर्वी याच ठिकाणी सनशाइन इंग्लिश स्कूल होते त्यामुळे सर्वत्र स्वच्छता होती. पण या ठिकाणी शाळा व पंचायत समिती ची जागा बदलली तेव्हापासून या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा येथील लोकांना सूचना केल्या असतानाही सर्वजण याच ठिकाणी सौचास येतात. याच ठिकाणी फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेते बसत असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा होतो.त्यामुळे हे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत अनेक वेळा वरिष्ठांशी चर्चा करून समस्या सांगितले असतानाही वरिष्ठांचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येते.या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार का केली म्हणून येथील गावगुंडांनी शिक्षण विभागाची भिंतच पाडून टाकली व आमची तक्रार कोणी करू नका अशा प्रकारची सूचनाच त्यांनी या माध्यमाने केली असल्याचे बोलले जात आहे. कर्मचारी नाकाला रुमाल बांधूनच या ठिकाणी प्रवेश करतात व दिवसभर घाणीत राहून काम करत असल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.वरिष्ठांनी याकडे ताबडतोब लक्ष देऊन ही समस्या दूर करावी अशी मागणी येथील कर्मचारी व सुजाण नागरिक करत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.