सराफा व्यापाऱ्याची बॅग लुटण्याच्या तयारीत असलेल्या नाशिक व लातूर येथील आरोपींना लोखंडी तलवार,बताई सह अटक. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
लातूर (प्रतिनिधी ) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .
त्या अनुषंगाने सदर पथके गुन्हेगारांची माहिती संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 04/12/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, काही इसम जुने गुळ मार्केट परिसरातील असलेल्या वाहनाच्या पार्किंग परिसरामध्ये संशयितरित्या फिरत असून सराफ व्यापाऱ्याची सोन्याच्या दागिन्याची बॅग लुटण्याच्या तयारीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ जुना गुळ मार्केट पार्किंग येथे पोहोचून बातमीमध्ये मिळालेल्या वर्णनाच्या माहितीवरून पार्किंग परिसरात संशयितरित्या थांबलेल्या इसमांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव
1) संतोष अशोक पटेकर 26 वर्ष राहणार आम्रपाली नगर,कॅनल रोड, उपनगर जिल्हा नाशिक.
2) निलेश उर्फ भारत उर्फ नाना बापू क्षीरसागर वय पंचवीस वर्ष राहणार आम्रपाली नगर, कॅनल रोड, उपनगर जिल्हा नाशिक.
3) ज्ञानेश्वर शरद पोतदार, वय 31 वर्ष, राहणार खोरी गल्ली, लातूर.
4) अक्षय लक्ष्मण महामुनी, वय 28 वर्ष, राहणार 5 नंबर चौक, पंचवटी नगर, लातूर. असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये लोखंडी तलवार, एक लोखंडी बतई व एक दातऱ्या असलेला धारदार विळा मिळून आला.
काही सराफा व्यापारी सकाळी आपले वाहन पार्किंग मध्ये लावून सोन्याच्या दागिन्याची बॅग दुकानात घेऊन येतात व परत संध्याकाळी ती बॅग घरी घेऊन जातात हीच संधी साधून,अंधाराचा फायदा घेऊन सराफा व्यापाऱ्याची सोन्याच्या दागिन्याची बॅग लुटण्याचा कट करुन त्यासाठी लातूर येथील दोघांनी चार ते पाच दिवसापूर्वी त्यांच्या ओळखीच्या नाशिक येथील आणखीन दोघांना बोलावून घेऊन तीन-चार दिवसापासून पार्किंग परिसराची रेकी करून आज रात्री एका सराफा व्यापारी सोन्याच्या दागिन्याची बॅग घरी घेऊन जात असताना अंधाराचा फायदा घेऊन शस्त्राचा धाक दाखवून बॅग लुटणार होतो असे सांगून ज्ञानेश्वर पोतदार व अशोक महामुनी यांना देणे झाल्याने व ते कर्जबाजारी झाल्याने आर्थिक विवंचनेतून,अडचणीमुळे पैसे मिळवण्यासाठी सदरचा प्रकार केल्याचे कबूल केले.
त्यावरून नमूद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अमलदार सुधीर कोळसुरे यांचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे गांधीचौक येथे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास गांधी चौक पोलीस करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहिती मिळवून तात्काळ व उत्कृष्ट कारवाई करत गुन्हा घडण्याच्या अगोदरच आरोपींना ताब्यात घेऊन शस्त्राचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्याची बॅग लुटण्याच्या गंभीर गुन्हा घडण्यापासून रोखला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, संतोष खांडेकर, प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.