अंजुमने इस्लामचे शैक्षणिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी : मा.शरद पवार* *डॉ. जहीर काझी जा-नशीने सरसय्यद पुरस्काराने सन्मानित*

 *अंजुमने इस्लामचे शैक्षणिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी : मा.शरद पवार*

*डॉ. जहीर काझी जा-नशीने सरसय्यद पुरस्काराने सन्मानित*





सोलापूर- डॉ. जहीर काझी गौरव समिती, सोलापूरच्यावतीने अंजुमन इस्लाम, मुंबई एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांनी केलेल्या उल्लेखनीय व अमुल्य शैक्षणिक व सामाजिक कार्याने अंजुमने इस्लामचे नांव जागतिक स्तरावर नेल्याबद्दल व अंजमुने इस्लामला १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना जा-नशीने सरसय्यद हे पुरस्कार माजी कृषीमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्या शुभहस्ते हिराचंद नेमचंद अॅफी थिएटर येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर माजी महापौर महेश कोठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार, खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, गौरव समितीचे अध्यक्ष ॲड. यु. एन. बेरिया, हाजी अय्युब मंगलगिरी, सोलापूरचे को-ऑर्टिनेटर हाजी रियाजअहमद पीरजादे, डॉ. जे. बी. दफेदार, मौलाना ताहेर बेग, मौलाना हारीस इशायती आदी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, डॉ. जहीर काझी हे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अतिशय उत्तम पद्धतीने कार्य करत असून त्यांच्या कार्याची सर्वांनी दखल घेऊन जीवनात कार्य करणे जरूरीचे आहे. आज अंजुमनने सारे जगात लौकीक मिळालेला आहे.  त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवद्गार राष्ट्रीवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी काढले.

प्रथम कार्यक्रमाची सुरूवात मौलाना हारीस इशायती यांनी कुरान पठणाने केली.  ॲड. यु.एन. बेरिया यांनी प्रास्ताविकात कार्यकामाची रूपरेषा सांगितली.  डॉ. एन. एन. मालदार यांनी मानपत्राचे वाचन केले.

डॉ. जहीर काझी सत्काराला उत्तर देताना म्हणाले, मुस्लिम समाजातील अंजुमन इस्लाम एक चॅरिटेबल ट्रस्ट असून ते भारतातील एक प्रमुख शैक्षणिक समूह आणि सामाजिक संस्था आहे. याची सुरवात एका शाळेपासून झाली आणि आज त्यात पूर्व प्राथमिक शाळेपासून ते पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण या संस्थेत दिले जाते. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, युनानी मेडिकल कॉलेज, कॉलेज ऑफ एज्युकेशन, हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मुस्लिम अल्पसंख्याक मुलींसाठी दोन वेगळे आश्रम शाळा असून त्यांना पदवीपर्यंत शिक्षण देऊन त्यांचे लग्न करून दिले म्हणून विविध समुदायातील लाखो विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणारी संस्था म्हणून याची ओळख आहे. या संस्थांमध्ये ८५ टक्के मुस्लिम महिला कार्यरत आहेत, याचा मला अभिमान आहे. सोलापुरात लवकरच लॉ कॉलेज, फार्मसी कॉलेज व विज्ञान पदवी महाविद्यालय सुरू करण्यात येईल याची ग्वाही दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुबेर कुरेशी, हाजी इसाक शेख, मुख्तारअहमद हुमनाबादकर, इमतियाज कमीशनर, इक्बाल बागबान, हाजी मैनोद्दीन शेख, इम्तीयाज हंजगीकर, म. जाहीद पीरजादे, जावीद दंडोती आदी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन सईद अहमद सईद यांनी केले तर आभार विकारअहमद शेख यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या