- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.10-04-2024
मुस्लीम धर्मीयांचा पवित्र महिणा म्हणून रमजान महिण्याकडे पाहिले जाते. या महिण्यामध्ये आध्यात्मिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक विचाराची शक्ती देण्याचे काम केले जाते. याच महिण्यामध्ये दानधर्म करून पवित्र विचार करून रुजवण्याचे काम केले जाते. जगामध्ये इंडोनिशिया, पाकिस्तान नंतर भारतामध्ये मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. या बांधवांना एकत्र ठेवून महम्मद पैगंबरांनी धार्मिक व मानवतेचे विचार रूजविण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे खर्या अर्थाने महम्मद पैगंबर यांचे विचार हे त्रिलोकातील मानव कल्याणाची प्रेरणार देणारे आहेत असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी ते पटेल नगर भागातील पटेल फंक्शन हॉल येथे युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीप्रसंगी बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला भाजपा महिला आघाडीच्या नेत्या सौ.अर्चनाताई शैलेश पाटील चाकूरकर, भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस मिनाताई भोसले, मौलाना हाजी फेरोज पटेल, मौलाना फैजलसाब, हाजी जाफर पटेल, अत्तरवाले नाना, अब्दुल गुरू अली, असिद पटेल, अफरार पटेल, अन्सार पटेल, अन्जूम पटेल, शिरीष कुलकर्णी, विश्वजीत पाटील कव्हेकर, लालासाहेब देशमुख, ताहेर शेख रेणापूरकर, संजय गिर, अफरीन खान, रागिणी यादव, मुन्ना हाश्मि, सहेफाज पटेल, मनपाचे माजी सभपती दीपक मठपती, ज्योतीराम चिवडे,बालाजी शेळके, महेश कौलखेरे, बदु्रद्दिन शेख, अब्दुलभाई शेख, जावेद शेख, रसूल शेख मिस्त्री, सरदार शेख, पत्रकार महेबूब चौधरी, सालार शेख, फेरोज पठाण, मासूम खान, आसिफ पटेल, प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, मुख्यध्यापक शिवाजी सूर्यवंशी, विनायक टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, मी महात्मा बसवेश्वर, प्रभू रामचंद्र, भगवान गौतम बुध्द यांच्या विचारावर माझी वाटचाल सुरू आहे. भारतातील सनातन धर्म आपला आहे. पवित्र कुरानच्या माध्यमातून अल्लाचे विचार मांडण्याचे काम केलेले आहे. या ग्रंथामध्ये त्रिलाकातील मानवाचे कल्याण साधण्याचाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याबरोबरच जगातील मुस्लीम बांधवांचे प्रेम, स्नेहभाव वाढविण्याचे काम करण्यात आलेले आहे. या माध्यमातून मुस्लीम तरूणांच्या एका हाथामध्ये कुराण आणि दुसर्या हाथामध्ये लॅपटॉप देण्याचे काम आपण करावे. यामुळे येणार्या काळातही मोठे परिवर्तन होणार आहे. याचे उदाहरण म्हणजे कर्नाटकातील रशीद काद्री व फैजल अली यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलेले आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही मुहम्मद पैगंबराचे विचार आत्मसात करून त्रिलोकातील मानवाचे कल्याण करण्याचे काम आपण करावे असे आवाहनही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
इफ्तार पार्टीच्या प्रांरभी अजितसिंह पाटील कव्हेकर परिवाराच्यावतीने मौलाना हाजी फेरोज पटेल व मौलाना फैजलसाब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संयोजन समितीच्यावतीने भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या इफ्तार पार्टीला लियाज चौधरी, सलीम शेख, अल्ताफ शेख, शब्बीर शेख, जमील भाई मिस्त्री, संतोष जाधव, रियाज शेख, बालाजी शेळके,शादुल शेख, आकाश बजाज, सागर घोडके, अॅड.पंकज देशपांडे, गजेंद्र बोकण, जीवन जाधव यांच्यासह मुस्लीम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रत्येक जातीधर्माचा सन्मान हीच आपली संस्कृती - अजितसिंह पाटील कव्हेकर
मुस्लीम बांधवांचा पवित्र सन म्हणून रमजान महिण्याकडे पाहिले जाते. त्यामुळे रमजान सनानिमित्त सर्वांना शुभेच्छा या सनाच्या माध्यमातून सद्भावना व्यक्त करण्याचे काम केले जाते. या महिण्यामध्ये मुस्लीम बांधव उपवासाच्या माध्यमातून मोठा त्याग करतात, देवाचे स्मरण करून सद्विचार पेरण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांचाही सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे खर्या अर्थाने प्रत्येक जातीधर्माचा सन्मान हीच आपली संस्कृती आहे असे प्रतिपादन युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.
--------------------------े---
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.