औसा (प्रतिनिधी) ईद-उल-फित्र रमजान ईद निमित्त औसा शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी दिनांक 11 एप्रिल गुरुवार रोजी ईदगाह मैदान येथे सकाळी साडे नऊ वाजता औशाचे काझी मिरमुजम्मीलअली यांनी नमाज अदा केली व त्यानंतर त्यांनी सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी,सुख-शांती तथा देशात अमन कायम राहो अशी अल्लाहकडे दुवा मागितली.यावेळी औसा शहरातील मोठ्या संख्येने नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव उपस्थित होते.तसेच यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार,तहसीलदार भरत सुर्यवंशी,नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे,तलाठी विकास बिराजदार,विरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता,कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे,कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे,तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी,उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे संतोष सोमवंशी,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भरत सुर्यवंशी,नगर परिषदेचे कर्मचारी सचीन माळी,भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,शहराध्यक्ष सुनील उटगे,संतोषप्पा मुक्ता,लहुजी कांबळे,शिवकुमार मुर्गे,अक्रम पठाण,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अविनाश टिके,कृष्णा सावळकर आदी मान्यवर ईदगाह मैदान येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.