भाग्यश्री सुडे खून खटला जलद गती न्यायालयात चालवून मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्या. या मागणीसाठी लातूर मध्ये निघाला न्याय मोर्चा.*


*भाग्यश्री सुडे खून खटला जलद गती न्यायालयात चालवून मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्या. या मागणीसाठी लातूर मध्ये निघाला न्याय मोर्चा.*




लातूर :- भाग्यश्री सुर्यकांत सुडे हिच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी, हा खून खटला जलद गती न्यायालयात चालवला जावा. तसेच या खटल्यासाठी ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. आणि भाग्यश्री सूर्यकांत सूडे हीला न्याय मिळावा, यासाठी आज लातूर मध्ये न्याय मोर्चा व कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते . 



सदरचा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघून छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौकाला प्रदक्षिणा करून परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मध्ये आला.

मोर्चा येथे आल्यानंतर काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. 






यावेळी माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख, माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार धीरज देशमुख, माजी खासदार सुधाकर श्रंगारे, डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, लोकाधिकारप्रमुख तथा हरंगुळ चे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे, भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, लोकाधिकार संघाचे मराठवाडा प्रमुख सुरेंद्रभाई अकनगीरे, डॉक्टर नरसिंह भिकाने, प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रल्हाद गड्डीमे, रामचंद्र तिरुके, अभिषेक आकनगिरे, डी. एन. शेळके, डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, डॉक्टर सुरेखा काळे, सुनीता आरळीकर, स्वाती जाधव यांच्यासह हजारो नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या