समाजातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी
डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातुर लोकसभेचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे
यांच्या प्रचारार्थ वासनगाव येथे संवाद बैठक
संपूर्ण ताकदीनिशी डॉ शिवाजी काळगे
यांना निवडून देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
लातुर प्रतिनिधी : दि. १५ एप्रिल २०२४
देशातील सामान्य माणसाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी, समाजातील भीतीचे
वातावरण दूर करण्यासाठी, शेतमालाला हमीभाव देण्यासाठी, महागाई भरमसाठ
वाढली ती कमी करण्यासाठी, उच्चशिक्षण घेऊन देखील बेरोजगार असलेल्या
युवकांना रोजगार देण्यासाठी, महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी,
कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे, ती सुधारण्यासाठी, मनरेगा अंतर्गत
हाताला काम मिळावे यासाठी आपण डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे, असे
आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा
लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले
लातुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार
डॉ. शिवाजी काळगे यांचा मतदारांशी परिचय व्हावा यासाठी गेल्या कांही
दिवसापासून लातुर लोकसभा मतदारसंघात सुसंवाद बैठका घेतल्या जात आहेत.
लातुर विधानसभा मतदार संघातील वासनगाव येथे सोमवार दि. १५ एप्रिल रोजी
सायंकाळी रमेश थोरमोटे पाटील यांच्या निवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकीय
शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद बैठक घेण्यात आली यावेळी
ते बोलत होते. या बैठकीला वासनगावसह परिसरातील जेष्ठ नागरिक, युवक
उपस्थित होते.
यावेळी पूढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,
लातुर लोकसभा निवडणुक २०२४ निमित्ताने आपण वासनगाव याठिकाणी डॉ. शिवाजी
काळगे यांच्या प्रचारार्थ आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एकत्र आलेलो
आहोत. वासनगाव हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून आदरणीय लोकनेते
विलासराव देशमुख साहेब यांच्या हृदयाजवळील हे गाव असून या ठिकाणी
आल्यानंतर आपल्या घरी असल्याचे वाटते असे सांगीतले. यावेळी पूढे बोलतांना
म्हणाले, लातुर लोकसभेचे तत्कालीन खासदार मतदार संघात सोडा, सभागृहात तरी
कधी आले की नाही? कधी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले की नाही? अशी शंकाच
आहे. सदया आपल्याला सामान्य माणसाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी, भीतीचे
वातावरण दूर करण्यासाठी, शेतमालाला भाव देण्यासाठी, महागाई भरमसाठ वाढली
ती कमी करण्यासाठी, उच्चशिक्षण घेऊन देखील बेरोजगार असलेल्या युवकांना
रोजगार देण्यासाठी, महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी, कायदा व
सुव्यवस्था बिघडलेली आहे, ती सुधारण्यासाठी, मनरेगा अंतर्गत हाताला काम
मिळावे यासाठी आपण डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे, असे आवाहन
त्यांनी केले. आज देशात आणि राज्यात काय सुरू आहे हे आपण पाहत आहोत.
प्रत्येक भारतीयांच्या मनात भीती आहे आणि सरकार केवळ भूल थापा
देण्यापलीकडे काहीच करीत नाही. सोयाबीनला १० वर्षांपूर्वी सरकारने दाम
दुप्पट करण्यात येणार असे आश्वासन दिले आज सोयाबीनचे भाव वाढणे तर दुर
उलट कमी झाले असे सांगीतले.
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, मागील काळात
आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी जे विचार दिले यावर आपले लातुर
घडले. यापुढे देखील लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला काँग्रेस
पक्षाच्या पाठिशी उभे राहावे लागेल. आम्ही तर आहोत आमच्या सोबत म्हणजे
आमदार आणि खासदार असे डबल इंजिन लातूरच्या विकासासाठी असल्यास लातुरचा
विकास आणखीन झपाट्याने होईल यासाठी आपण बाकीच्या चर्चा अधिक करण्या ऐवजी
आपली व आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांची चर्चा करावी, विरोधी पक्षा
पेक्षा आपला उमेदवार किती चांगला आहे याची माहिती प्रत्येक मतदाराला
द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
गावच्या विकासनीधीसाठी लोकसभेचे उमेदवार
डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे
यावेळी प्रस्ताविक करताना सोनाली थोरमोटे पाटील म्हणाल्या की, आपले
लोकसभेचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ ही बैठक होत असून
माजी मंत्री आमदार अमित देशमुख साहेबांच्या सहकार्याने गेल्या कांही
वर्षात आपल्या गावाला केवळ स्थानिक आमदार निधी मिळाला आणि गावचा सर्व
बाजूने विकास झाला. पण तत्कालीन खासदारांनी कुठलाही निधी आजतागायत
वासनगावाला दिला नाही. त्यामुळे आपण सर्वांनी महाविकास आघाडी काँग्रेस
पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे
अशी उपस्थित ग्रामस्थांना विनंती केली.
यावेळी निरीक्षक सर्जेराव मोरे, तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, तात्यासाहेब
देशमुख, श्रीकृष्ण पाटील, रमेश थोरमोटे पाटील, सतीश कानडे, लक्ष्मण
मारडकर, हरिभाऊ घोगरे, भूजंग जाधव, भागवत साळुंके, नामदेव मारडकर, विठ्ठल
डुरे, रघुनाथ मस्के, विठ्ठल पाटील, रावसाहेब जाधव, सुखदेव पाटील
यांच्यासह वासनगाव परिसरातील जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी
या बैठकीला उपस्थित सर्वांचे आभार गोविंद डुरे पाटील यांनी मानले.
--
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.