औसा : औसा येथील पालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांची बदली स्थगिती आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे त्यामुळे आदेशाची तात्काळ दखल जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांचा पदभार जिल्हा सह आयुक्त रामदास कोकरे यांच्याकडे सोपविला आहे.
मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांचे २ फेब्रुवारी रोजी नगर विकास विभागाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर नगरपंचायत येथे बदली केली होती मात्र मुख्य अधिकारी हे २४ दिवस झाले तरी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत त्या मुळे
२६ फेब्रुवारी रोजी नगर विकास विभागाने बदली स्थगिती दिली दरम्यान औरंगाबाद खंडपीठात बालाजी मस्के यांनी याचिकेद्वारे या निर्णयास आवाहन दिले त्यावर न्यायालयाने १२ एप्रिल रोजी निर्णय देत बदली वरील स्थगितीला अंतिमतः रद्द करत चौकशीचे आदेश दिले त्याचा अहवाल ९० दिवसात सादर करण्याचे संबंधित विभागाला आदेशित केले आहे या निर्णयानंतर नगर विकास विभाग व जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून मुख्याधिकारी रणदिवे यांचा पदभार काढून घेत सह आयुक्त रामदास कोकरे यांच्याकडे दिला असून त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.