औसा येथे भर पावसात भिमसागराचा जल्लोष

औसा येथे भर पावसात भिमसागराचा जल्लोष

औसा : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त औसा शहरात १४ एप्रिल २०२४ रोजी भर पावसात आंबेडकर प्रेमी बांधवांनी भीम जल्लोष करीत घटनेच्या शिल्पकारांना अभिवादन केले. औसा शहरासह ग्रामीण भागातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भीमसैनिकांनी महामानवाला अभिवादन केले औसा येथील भीम नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना व त्रिशरण मंत्र उच्चार करून महामानवाला अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष धम्मदीप डांगे, तक्षशिला सामाजिक प्रतिष्ठानचे राजेंद्र बनसोडे, अशोक
बनसोडे, केंद्रीय शिक्षक रावसाहेब सूर्यवंशी, माजी नगरसेविका कल्पना डांगे, वंचित बहुजन आघाडीचे अँडव्होकेट जयराज जाधव यांनी तर बौद्ध नगर परिसरात बुद्ध विहार समोर महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून या परिसरातील नागरिकांनी अभिवादन केले. समता नगर परिसरामध्ये बौद्धाचार्य उद्धव लोंढे, श्रीपतराव जाधव, वसंत टेंकाळे, सुरेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून घटनाकारांना अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येथे लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने सर्वश्री संभाजी शिंदे, शामराव शिंदे, जालिंदर बनसोडे, डॉक्टर श्रीमंत क्षीरसागर, पंढरीनाथ जाधव, माजी नगरसेवक अंगद कांबळे, पवन कांबळे, युवराज कसबे यांनी प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या