औसा शहरातील मृत्यू झालेल्या व्यक्तीची नोंद करुन मृत्यू प्रमाणपत्र व मानधन तात्काळ द्या.सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची मागणी
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील मृत्यू झालेल्या व्यक्तीची नगर परिषद मार्फत नोंद करुन मृत्यू प्रमाणपत्र व नगर पालिकेच्या वतीने मानधन तात्काळ देण्यात यावे यासाठी एम आय एम च्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
नगर पालिकेच्या मार्फत औसा नगर पालिकेने मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी 500 रु. देण्याचे अनेक वर्षापासुन चालु आहे. व त्यांना यापुर्वी मृत्यू प्रमाणपत्र व 500 रु. रक्कम नगर पालिकेमार्फत त्यांना भेटून देण्यात येत होती. परंतु सद्या नगर पालिकेत कॉन्सील नसल्यामुळे नगर पालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारी पणामुळे शहरातील नागरीकांना आपल्या घरात मृत्यू झाले आहे असे अर्ज करावे लागते. व त्यांना दोन साक्षीदारांना त्यांचे ओळखपत्र आणा असे पालिकेमार्फत सांगण्यात येत आहे. यासाठी शहरातील नागरीकांना आपल्या कुटुंबातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी पालिकेकडे वारंवार फेऱ्या मारावे लागत आहे. कांही गरीब कुटुंबांना अंत्यविधीसाठी सदर रक्कम अत्यंत आवश्यक आहे. कॉन्सील अस्तीत्त्वात नसल्यामुळे पालिकेचे कर्मचारी नगर पालिकेचे प्रमाणपत्र मागत आहेत.
तरी मा. मुख्याधिकारी यांनी सदर प्रकरणात योग्य ती दखल घेऊन मृत्यू प्रमाणपत्र तात्काळ देण्याबाबत संबंधीतांना आदेशीत करावे .अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.