सुलेमान शेख 12वी परीक्षेत लातुर जिल्ह्यात सर्व प्रथम*

 *सुलेमान शेख 12वी परीक्षेत लातुर जिल्ह्यात सर्व प्रथम






औसा येथील अजीम कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सुलेमान अफसर शेख हा बारावी विज्ञान परीक्षेमध्ये 95.17% इतके  गुण घेऊन लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम आलेला आहे. याबाबत त्याची सर्वत्र कौतुक होत आहे.

सुलेमान अफसर शेख हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी विभागाची जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत असून  उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे विश्वासू म्हणून समजले जाणारे डॉ. अफसर शेख यांचे ते चिरंजीव आहेत तसेच स्व. एन.बी.शेख यांचे ते नातू आहेत. याआधी त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीवर प्रदेश सचिव म्हणून काम केलेला आहे व विद्यार्थी संघटनेत काम करत असताना विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी शासन दरबारी, विद्यापीठ स्तरावर, तसेच जिल्हास्तरावर आवाज उठवला आहे व अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

याबाबत श्री सुलेमान शेख यांच्याशी बोलताना त्यांनी पुढील शिक्षण हे विधी मध्ये पूर्ण करण्याचे मनोदय व्यक्त केले. व औसा तालुक्यातील व शहरातील गरजूंना मोफत विधी सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली.

श्री सुलेमान शेख यांच्या या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मंत्री श्री संजय बनसोडे, शिक्षक आमदार श्री विक्रम काळे पदवीधर आमदार श्री सतीश चव्हाण, आमदार श्री बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख, कार्याध्यक्ष श्री पंडीत धुमाळ साहेब व अजीम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री निजाम शेख व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व  शिक्षक वृदांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या