मुंबई घाटकोपर होर्डिंग्ज अपघातातील मृतात्म्यांना लातूरात श्रद्धांजली.
लातूर दि 17 मे मुंबई घाटकोपर होर्डिंग्ज कोसळल्यानंतर 14 हुन अधिक जणांना आपला जिव गमवावा लागला तर अजुनही शोध बचावकार्य सुरु आहे. रचनेच्या मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेच्या रचनेचे हे होर्डिंग्ज घातक ठरल्यामुळे राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असुन लातूर येथे शहिद अहमदखान पठाण कृती समितीच्या वतिने शहरातील मुख्य बाजारपेठ गंजगोलाई येथे उभा असलेल्या एलईडी युनिपोल जवळ या घटनेतील मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
भौगोलिक दृष्ट्या पठारावर असलेल्या लातूर ला वाऱ्याचा वेग ताशी 78 किलोमीटर इतका अंदाज आहे तर वादळीवा-यासह मुसळधार पाऊसाचा अंदाज लावता येत नाही असे हवामान खात्याकडून समजते. लातूर महानगरपालिकेने निविदा मागवून होर्डिंग्ज व युनिपोल चा कोणताही कायदा नसताना निविदा भरल्या व शहरात 27 युनिपोल उभा केले. हे युनिपोल लोखंड धातुपासुन बनवण्यात आले असुन प्रत्येकी एका युनिपोल चे वजन 2000 किलो आहे. यांची रचना तोकड्या नटबोल्टवर करण्यात आली आहे तर जमिनीपासून तिस फुटापेक्षा जास्त उंच आहेत. वादळीवा-याचा वेग अनियंत्रित झाला तर हे युनिपोल उन्मळून पडु शकतात असे मत शहिद अहमदखान पठाण कृती समितीचे सर्फराज सय्यद यांनी सांगितले आहे तर हे घातक ठरु शकणारे युनिपोल तात्काळ हटवण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी लातूर लोकसभा चे अपक्ष उमेदवार उमेश कांबळे, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष सचिन गायकवाड, समितीचे सय्यद सरफराज, इस्माईल शेख, तोसिफ शेख, सय्यद परवेझ, सय्यद सलीम, शादुल शेख, इजहार, साबेर, नोमान शेख, बिलाल शेख, सोहेल शेख, आदिल पठाण, अरबाज भाई यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.