जिल्ह्यात सर्वत्र पहिल्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.

 जिल्ह्यात सर्वत्र पहिल्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.








शेख बी जी.


औसा.दि.16 जिल्ह्यात सर्वत्र तब्बल दीड महिना सुट्ट्या संपल्यानंतर 15 जून रोजी शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

शनिवार असतानाही व पुढे  दोन दिवस सुट्टी असतानाही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

       जिल्ह्यात पहिल्या दिवशी शाळा भरवताना शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पुस्तके तसेच पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे आदेशित करण्यात आले होते.त्या अनुषंगाने पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह भरभरून दिसून आला. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या भरपूर दिसून आली तर काही शाळेतील शिक्षक विद्यार्थी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात दिसून आले.

मौजे आंदोरा येथील अमृशा बाबा उर्दू शाळेमध्ये शिक्षकांसह विद्यार्थ्यांत उत्साहाची वातावरण होते.यावेळी शाळेचे प्राथमिकचे तय्यब पठाण तर माध्यमिकचे वाजिद पठाण या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केलेली दिसून आली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या